मुंबई, 12 फेब्रुवारी : अभिनेता इरफान खान मागच्या काही काळपासून ‘न्यूरो इंडोक्राइन टयूमर’ या आजाराशी झुंज देत आहे. पण मध्यंतरीच्या काळात त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यानं त्याच्या आगामी सिनेमा अंग्रेजी मीडियमचं शूटिंग पूर्ण केलं. पण त्यानंतर त्याची तब्येत पुन्हा बिघडल्यानं सध्या तो अमेरिकेत उपचार घेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर 13 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. त्याआधी इरफान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंग्रेजी मीडियम या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याआधी इरफान खाननं एक भावूक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यानं प्रकृतीच्या कारणानं या सिनेमाच्या प्रमोशनला उपस्थित राहता येणार नसल्याची खंत व्यक्त केली. बॉलिवूडमध्ये नक्की काय चाललंय? गणेश आचार्यनंतर आता अभिनेत्यावर गुन्हा दाखल व्हिडीओमध्ये या सिनेमाच्या सेटवरील काही दृश्य पाहायला मिळत आहेत तर व्हिडीओच्या बॅकग्राउंडला इरफान खानचा आवाज ऐकू येतो. इरफान म्हणतो, नमस्कार माझ्या बंधू-भगिनींनो, मी इरफान. मी आज तुमच्यासोबत आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. पण हा सिनेमा ‘अंग्रेजी मीडियम’ माझ्यासाठी खूप खास आहे. या सिनेमाचं प्रमोशन जोरदार करावं आणि त्यात मी सुद्धा सहभागी असावं अशी माझी खरंच खूप इच्छा होती. मात्र माझ्या प्रकृतीच्या कारणानं मी ते करु शकत नाही…. हा सिनेमा तुम्हाला शिकवेल, हसवेल, रडवेल आणि पुन्हा हसवेल… हा सिनेमा नक्की पाहा आणि हो माझी वाट पाहा…
इरफान खानचा हा व्हिडीओ पाहणारा कोणीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं. ज्यात इरफान क्वीन गार्डच्या वेशात आहे तर अभिनेत्री राधिका मदत त्याला मिठी मारुन उभी असलेली दिसत आहे. हा सिनेमा येत्या 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात इरफान खानसोबत करिना कपूर, राधिका मदन, पंकड त्रिपाठी, किकू शारदा, रणवीर शोरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कल्किनं 17 तास प्रसुती कळा सहन केल्यावर घेतला होता धक्कादायक निर्णय, पण… मागील वर्षी (2018) त्याला ‘हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर’चं निदान झालं होतं. मागच्या वर्षी प्रकृतीत सुधारणा झाल्यानं इरफाननं अंग्रेजी मीडियम सिनेमाचं शूट सुरू केलं मात्र या सिनेमाचं शूट संपल्यावर त्याला पुन्हा एकदा उपचारासाठी लंडनला परतावं लागलं. VIDEO : तापसी पन्नूनं स्वतःच सांगितलं Thappad Trailer रिपोर्ट करा, काय आहे कारण