बॉलिवूडमध्ये नक्की काय चाललंय? गणेश आचार्यनंतर आता अभिनेत्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल

बॉलिवूडमध्ये नक्की काय चाललंय? गणेश आचार्यनंतर आता अभिनेत्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी कोरिओग्राफर गणेश आचार्यवर एका महिला कोरिओग्राफरनं जबरदस्तीनं अडल्ट व्हिडीओ पाहायला लावत असल्याचा आरोप केला होता.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : बॉलिवूडमधील कलाकारांवर विनयभंग किंवा छेडछाडीचा गुन्हा दाखल होण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कोरिओग्राफर गणेश आचार्यवर एका महिला कोरिओग्राफरनं जबरदस्तीनं अडल्ट व्हिडीओ पाहायला लावत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘कर्मफलदाता शनी’, ‘फीर लौट आयी नागिन’ आणि ‘राम सिया के लव कुश’ फेम अभिनेता शाहबाज खानविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Case Of Molestation). अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप शाहबाज खानवर आहे (Actor Shahbaz Khan). या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहितीनं ANI नं त्यांच्या ट्वीटरवरुन दिली.

VIDEO : तापसी पन्नूनं स्वतःच सांगितलं Thappad Trailer रिपोर्ट करा, काय आहे कारण

शाहबाझनं आतापर्यंत ‘कर्मफलदाता शनी’, ‘फीर लौट आयी नागिन’, ‘राम सिया के लव कुश’, ‘दास्तान-ए-मोहोब्बत सलीम अनारकली’, ‘अफसर बिटिया’, ‘चंद्रकांता’, ‘युग’ अशा हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यांना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबतही अभिनय केला आहे. यात अमिताभ बच्चन यांचा ‘मेजर साहब’ सैफ अली खानचा ‘एजंट विनोद’, सनी देओलचा ‘द हीरो: लव स्टोरी ऑफ स्पाय’ या सिनेमांचा समावेश आहे.

लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत होती नेहा कक्कर, आता व्हायरल झाले ‘असे’ PHOTO

मलायकाशी लग्न करण्यास अर्जुन का करतोय टाळाटाळ, समोर आलं कारण

First published: February 12, 2020, 12:37 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या