मुंबई, 12 फेब्रुवारी : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्लीत दुसऱ्यांदा विक्रमी बहुमत मिळालं. अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असून भाजपने दिल्ली काबिज करण्याचं पाहिलेलं स्वप्न भंगलं आहे. गेल्या 22 वर्षांपासून दिल्लीत भाजप सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाही तर अरविंद केजरीवाल यांचाच करिष्मा चालल्याचं स्पष्ट झालंय. दिल्ली निवडणुकांच्या या निकालानंतर सध्या गायक अवधूत गुप्तेनं केलेलं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे. ऐतिहासिक निकाल देत दिल्लीकरांनी प्रत्येक भारतीयाच्या मनातली बात केली आहे, असं ट्विट करत गायक-संगीतकार अवधूत गुप्तेनं भाजपला कोपरखळी मारली आहे. दिल्लीकर मतदारांनी आम आदमी पक्षाच्या (आप) विकासाच्या धोरणाला एकतर्फी कौल दिला. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी ‘आप’ने 63 जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त 8 जागांवर समाधान मानावं लागलं.
कल्किनं 17 तास प्रसुती कळा सहन केल्यावर घेतला होता धक्कादायक निर्णय, पण…
दिल्ली निवडणुकांच्या निकालानंतर अवधूतनं त्याच्या ट्वीटरवर एक पोस्ट केली. त्यानं लिहिलं, ‘असा ऐतिहासिक निकाल देऊन दिल्लीकरांनी जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिलाय की आम्हाला शाळा, रस्ते आणि महिलांची सुरक्षा हवीये. मंदिरं, मशिदी, पुतळे, कलमं आणि त्यावरुन कुठलाही वाद नकोय! अभिनंदन दिल्लीकर!’ दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. त्यानंतर केजरीवालांनी कार्यकर्त्यांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. हा दिल्लीकरांचा विजय असून त्यांनी आपल्या मुलावर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला असं मत त्यांनी व्यक्त केलं. केजरीवाल म्हणाले, हा विकासाचा विजय आहे. आम्ही जी कामं केली त्याला लोकांनी पसंत केलंय. दिल्लीवालो.. गजब कर दिया, I Love You अशी सुरुवातच त्यांनी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांना प्रतिसाद दिला.
VIDEO : तापसी पन्नूनं स्वतःच सांगितलं Thappad Trailer रिपोर्ट करा, काय आहे कारण
लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत होती नेहा कक्कर, आता व्हायरल झाले ‘असे’ PHOTO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.