मुंबई, 10 मार्च : 'गुम हैं किसी के प्यार मैं' या हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये मालिकेचा भव्य सेट आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही आग लागली. 'गुम है किसी के प्यार मैं' या मालिकेच्या सेटच्या आजूबाजूला अनेक मालिकांचे छोटे छोटे सेट देखील होते. पहिल्यांदा 'गम है किसी के प्यार में' च्या सेटला आग लागली. बघता बघता आग पसरत गेली आणि शेजारी असलेले इतर 3 ते 4 सेट आगीच्या भक्ष्य स्थानी सापडले. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमनदलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत सुदैवानं कोणाला दुखापत झालेली नाही. मालिकेतील सगळे कलाकार आणि कर्मचारी सुखरूप आहेत. या भीषण आगीचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
'गुम हैं किसी के प्यार मैं' या मालिकेत मराठी कलाकार देखील काम करत आहेत. अभिनेत्री किशोरी शहाणे आणि भारती पाटील, अभिनेता सिद्धार्थ बोडके या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री आयेशा सिंह, नील भट्ट, ऐश्वर्या भट्ट, स्नेहा भावसार, ऋती पालवे हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत. आग लागल्यानंतर कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
हेही वाचा - Mumbai Fire : मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीत स्टुडिओला लागली आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO
'गुम हैं किसी के प्यार मैं' मालिकेच्या सेटला आग लागताच एकच खळबळ उडाली. आग लागली तेव्हा या ठिकाणी 1 हजारांहून अधिक लोक घटनास्थळी उपस्थित होते. त्यामुळे तातडीने कर्मचारी इतर कलाकारांनी घटनास्थळावरून जीव मुठीत धरून बाहेर धाव घेतली. आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आग लागली त्या क्षणी सेटवर आग विझवण्यासाठी कोणतीही अग्निरोधक उपकरण उपलब्ध नव्हतं.
मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग pic.twitter.com/p5GHe9KQ4n
— News18Lokmat (@News18lokmat) March 10, 2023
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. अध्यक्ष मालिकेचे निर्माते, चॅनेल आणि प्रोडक्शन हाऊस यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे.
एबीपीनं दिलेल्या वृत्तानुसार, गुम हैं किसी के प्यार मैं मालिकेच्या सेटवर बॉम्ब ब्लास्टचा सीन शुट होत होता. तेव्हाच सेटवर ही आग लागली. आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी सेटवर कोणतेही आग नियंत्रक यंत्र उपलब्ध नव्हतं. मालिकेचा सेट हा जवळपास 2000 स्क्वेअर फिट परिसरात लावण्यात आला आहे. सेटचा संपूर्ण भाग आगीत जळून खाक झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Serial, Tv serial, TV serials