मुंबई, 10 मार्च : मुंबईत पुन्हा एकदा आगीची मोठी घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागली. फिल्म सिटीमध्ये ‘गम है किसी के प्यार में’ च्या स्टुडिओला आग लागली, या आगीत 4 ते 5 स्टुडिओ जळून खाक झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका गम है किसी के प्यार में या मालिकेच्याच्या सेटवर शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आग लागली. मुंबईतील गोरेगावमध्ये या मालिकेचा सेट आहे. याच ठिकाणी इतर अनेक मालिकेचीही सेट आहे. पहिले ‘गम है किसी के प्यार में’ च्या सेटला आग लागली. बघता बघता आग पसरत गेली आणि शेजारी असलेले इतर 3 ते 4 सेट आगीच्या भक्ष्य स्थानी सापडले. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग pic.twitter.com/p5GHe9KQ4n
मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग pic.twitter.com/p5GHe9KQ4n
— News18Lokmat (@News18lokmat) March 10, 2023
यावेळी 1 हजारांहून अधिक लोक येथे उपस्थित होते. त्यामुळे तातडीने कर्मचारी इतर कलाकारांनी घटनास्थळावरून जीव मुठीत धरून बाहेर धाव घेतली. आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगीच्या घटनेत निष्काळजीपणाची बाब समोर येत आहे.आग विझवण्यासाठी सेटवर कोणतीही अग्निरोधक उपकरण नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, आगीने दोन मालिकांचे सेट जळून खाक झाले आहेत. दोन्ही मालिकांचा सेट ‘गम है किसी के प्यार में’ या शोच्या सेटच्या अगदी जवळ होते. सुदैवाने या आगीच कुणालाही दुखापत झाली नाही. (Mumbai local train मध्ये हेल्मेट घालून प्रवास, प्रवाशानेच सांगितलं कारण; पाहा VIDEO) दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कुर्ला परिसरात एका इमारतीला आग लागली होती. आगीने भीषण रौद्ररुपधारण केले आणि 6 मजले आगीच्या भस्मस्थानी सापडले. या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. मालाडमध्ये झोपडपट्टीत अग्नितांडव, 15 सिलेंडर फुटले, एकाचा मृत्यू तर, मुंबईतील मालाड परिसरामध्ये एका झोपडपट्टीमध्ये भीषण अग्नितांडव घडले. एकापाठोपाठ 15 सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीत एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर आगीत 10 ते 15 झोपडीधारक जखमी झाले आहेत. तर 50 पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग लागलेल्या झोपडीतील सिलेंडर फुडल्याने आगीचे रौद्ररूप धारण केले. फुटलेल्या सिलेंडरमुळे मयत १४ वर्षीय तरुणाच्या गळामध्ये पत्र्याचा तुकडा घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. एकूण 15 झोपड्या जळून खाक झाल्यात.