मुंबई, 12 डिसेंबर - बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi ) तीनचं पर्व सुरू झाल्यापासून सगळीकडे फक्त या पर्वाचीच चर्चा सुरू आहे. आता शो संपण्यास दोन आठवडे उरले आहेत. गायत्री दातार, सोनाली पाटील आणि जय दुधाणे डेंजरमध्ये होते. जय दुधाणे आणि सोनाली पाटील सेफ झाली आहे. या आठवड्यात गायत्री दातार घरातून बाहेर पडली आहे. महेश मांजरेकर यांनी गायत्री आऊट झाल्याचे सांगितले आहे. यावेळी मीरा खूप भावुक झाली होती. तसेच घरातील बाकीचे सदस्य देखील भावुक झाले होते. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झाली नव्या सदस्यांची एंट्री. घराचे रूपांतर लिलिपुट नगरात झाले आणि हे नवे सदस्य बनले हुकूमशहा. हा संपूर्ण आठवडा या हुकुमशहांनी चांगलच गाजवला मग तो एलिमनेशन टास्क असो, साप्ताहिक कार्य असो वा कॅप्टन्सी टास्क. मीनलला मिळाला बिग बॉस मराठीच्या घराचे शेवटचे कॅप्टनपद. तर नॉमिनेशन कार्यात गायत्री दातार, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील नॉमिनेट झाले. यामध्ये काल मीरा जगन्नाथ सेफ असल्याचे महेश मांजरेकरांनी घोषित केले. उत्कर्ष स्नेहामध्ये झाली शाब्दिक चकमक तर बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे विशालला सांगण्यात आली आता यामुळे इतक्या दिवसांची मैत्री पणाला तर लागणार नाही ना ? उत्कर्ष आणि जयने यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण करत लावणी सादर केली. इतक्या दिवसांच्या प्रवासानंतर कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये आल्या ज्यामध्ये गायत्री दातारला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. वाचा - विकी- कतरिनाने पाहुण्यांची अशी केली होती व्यवस्था; रूमचा Video Viral गायत्री दातारने ‘तुला पाहते रे’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले . या मालिकेत तिनं ईशा नावाच्या मुलीची भूमिका साकारली. यानंतर ती चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमधी दिसली. गायत्री मुळची पुण्याची आहे. गायत्री बिग बॉस मराठीच्या घरात जय दुधाणेच्या टीमसोबत खेळत होती. मात्र मागच्या काही दिवसांपासून ती स्वतंत्र खेळी लागली होती. यामुळे तिचा या घरातील खेळ प्रेक्षकांना आवडतही होता. मात्र आज पुन्हा तिला कमी मतांमुळे घरातून बाहेर जाव लागले आहे.
आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उरले आहेत टॉपसात सदस्य. बघूया हा आठवडा कसा जाणार ? काय काय धम्माल टास्क बिग बॉस सदस्यांना देणार. जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिजन 3 सोम ते रवि रात्री 9.30 वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.