मुंबई, 20 एप्रिल: आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करणारा ठरला. या सिनेमाने कोट्यवधींचा बिझनेस (Gangubai Kathiawadi Box Office Collection) केला. अभिनेत्री आलिया भट्टसह दिग्गज कलाकारांचा अभिनय आणि संजय लीला भन्साळी यांचे दिग्दर्शन हे समीकरण या सिनेमासाठी यश खेचून आणणारं ठरलं. दरम्यान सिनेमागृहांमध्ये आलिया भट्टच्या 'गंगू'ने जादू केल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे आता ज्या प्रेक्षकांना हा सिनेमा थिएटरमध्ये बघता आला नाही त्यांना लवकरच घरबसल्या हा सिनेमा पाहता येणार आहे. हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर (Gangubai Kathiawadi on Netflix) पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाने (Netflix India) याबाबत अधिकृत घोषणा करत माहिती दिली आहे.
हे वाचा-Ibrahim Ali Khan सोबतच्या फोटोबाबत Palak Tiwari चा खुलासा, म्हणाली- 'आईपासून लपण्यासाठी...'
नेटफ्लिक्स इंडियाने गंगूबाई काठियावाडीच्या ओटीटी प्रदर्शनाची घोषणा केली आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर 26 एप्रिलपासून पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. नेटफ्लिक्स इंडियाने अशी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे की, 'बघा चाँद नेटफ्लिक्सवर येणार आहे.'
View this post on Instagram
आलिया भट्ट, शंतनू माहेश्वरी, अजय देवगण, सीमा पाहवा आणि विजय राज यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांच्या जबरदस्त चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीचा सोशल मीडियावर हवा केली होती. काही कायदेशीर अडचणीतही हा सिनेमा अडकला होता. त्यानंतर कोरोना महामारीमुळे देखील चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले जात होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Netflix, Sanjay Leela Bhansali