मुंबई, 16 फेब्रुवारी- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुचर्चित 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) लवकरच चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. परंतु रिलीजपूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गंगूबाईच्या कुटुंबाचा या चित्रपटाला विरोध आहे. गंगूबाईनं समाजासाठी काम केलं, पण तिला सेक्स वर्कर म्हणून दाखवण्यात आल्याचं तिचे कुटुंबीय सांगतात. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. प्रेक्षक आलियाच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक करत आहेत. या चित्रपटात अजय देवगनचीही महत्वाची भूमिका आहे. हा चित्रपट येत्या 25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
वास्तविक पाहता 2021 मध्ये, गंगूबाईचा दत्तक मुलगा बाबू रावजी शाह यांनी 'गंगूबाई काठियावाडी' विरोधात मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली होती.
नुकतंच गंगूबाईचा मुलगा बाबू रावजी शाह यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, "माझी आई वेश्या बनली आहे. आता लोक विनाकारण माझ्या आईबद्दल बोलत आहेत. त्याच वेळी, गंगूबाईची नात भारती म्हणते की निर्माते पैशासाठी तिच्या कुटुंबाची बदनामी करत आहेत. चित्रपटासाठी कुटुंबाची संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' हे पुस्तक लिहिण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आली नाही.
गंगूबाईचे कौटुंबिक वकील नरेंद्र यांनी म्हटलं आहे, "गंगूबाईला जसं दाखवण्यात आलं आहे ते चुकीचं आणि निराधार आहे. हे अश्लील आहे. तुम्ही एका सामाजिक कार्यकर्त्याचं वेश्या म्हणून चित्रण केलं आहे. कोणत्या कुटुंबाला हे आवडेल?तुम्ही तिला व्हॅम्प आणि लेडी डॉन बनवलं आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Movie release, Sanjay Leela Bhansali, Upcoming movie