जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Flora saini : 'त्याने इतकं मारलं की....' 'स्त्री' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Flora saini : 'त्याने इतकं मारलं की....' 'स्त्री' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

 फ्लोरा सैनी

फ्लोरा सैनी

‘मी टू’ चळवळीदरम्यान फ्लोराने लिव्ह-इन पार्टनरने तिचं लैंगिक शोषण कसं केलं हे उघड केलं होतं. पण नुकतीच श्रद्धा वालकर सोबत घडाडलेल्या धक्कादायक घटनेने तिच्या वेदना पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, o7 डिसेंबर : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीने अलीकडेच तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.   ‘मी टू’ चळवळीदरम्यान फ्लोराने लिव्ह-इन पार्टनरने तिचं लैंगिक शोषण कसं केलं हे उघड केलं होतं. पण नुकतीच श्रद्धा वालकर सोबत घडाडलेल्या धक्कादायक घटनेने तिच्या वेदना पुन्हा ताज्या झाल्या आहेत. आपल्यासोबत पण श्रद्धासोबत जे घडलं तसंच  घडलं असतं असा खुलासा करत तिला  अश्रू अनावर झाले. याबद्दल बोलताना फ्लोराने प्रियकर तिला कसा मारायचा ते सांगितलं. त्याने अभिनेत्रीला धमकी दिली की जर फ्लोराने कोणालाही या छळाबद्दल सांगितलं तर तो तिच्या पालकांना ठार करेल. असा धक्कादायक खुलासा केला आहे. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत फ्लोराने सांगितले की, तिचा प्रियकर हा सिनेनिर्माता होता. त्याच्यासाठी तिने आपलं घर सोडलं आणि ते दोघं लिव्ह इनमध्ये राहू लागलेले. प्रियकराने फ्लोराला तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे सिद्ध करायला सांगितलेलं. अभिनेत्री म्हणाली की तो सुरुवातीला इतका गोड होता की तो अशाप्रकारे वागू शकतो हे आई- वडिलांनाही पटत नव्हतं. पण एकत्र राहिल्यानंतर आठवडाभरातच त्यांचा खरा चेहरा समोर आला.’’ अलीकडेच घडलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणानंतर तिला तिच्याबरोबर घडलेल्या गैरवर्तणुकीची आठवण झाली. “मी कुणालाही फोन करू नये, म्हणून गौरांगने आपला फोन काढून घेतला होता,” असा खुलासाही फ्लोराने केला. हेही वाचा - हंसिका मोटवानी ते प्रीती झिंटा ‘या’ अभिनेत्रींनी बांधली करोडपती बिझनेसमनशी लग्नगाठ फ्लोरा सैनी 2007 मधील त्या वेदनादायक रात्रीचा संदर्भ देत म्हणाली, ‘एका रात्री गौरांगने मला इतका जोरात मारले की माझा जबडा तुटला.’ त्याने आपल्या वडिलांचा फोटो दाखवला आणि सांगितले की तो शपथ घेत आहे की मी त्याला आज मारणार आहे. अभिनेत्रीने सांगितले की ती चित्र ठेवण्यासाठी वळताच तिला तिच्या आईचे म्हणणे ऐकू आले. आई म्हणायची- ‘असं काहीही झालं तरी पळून जा. कुठल्याही परिस्थिती असशील तरी फक्त तिथून पळ काढ.’’

जाहिरात

फ्लोरा पुढे म्हणाली की ती तिच्या घरी पळून गेली आणि तिने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. नंतर अभिनेत्रीने धैर्य दाखवले. अभिनेत्री संपूर्ण कुटुंबासह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. पण त्यावेळी पोलिसांनी तिची तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता, असंही ती म्हणाली. पण शेवटी फ्लोराची एफआयआर नोंदवण्यात आली.

News18लोकमत
News18लोकमत

फ्लोराने आतापर्यंत ‘स्त्री’, ‘लव्ह इन नेपाल’, ‘दबंग टू’, ‘लक्ष्मी’, ‘धनक’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यासोबतच अनेक वेब सिरीजमध्ये देखील ती झळकली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात