मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Gandhi Godse – Ek Yudh Trailer Out: गांधी गोडसे ट्रेलर रिलीज; चिन्मय मांडलेकरांचे दमदार डॉयलॉग एकदा ऐकाच

Gandhi Godse – Ek Yudh Trailer Out: गांधी गोडसे ट्रेलर रिलीज; चिन्मय मांडलेकरांचे दमदार डॉयलॉग एकदा ऐकाच

गांधी गोडसे ट्रेलर

गांधी गोडसे ट्रेलर

चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसे साकारणार आहे तर दीपक अंतानी महात्मा गांधी साकारणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  11 जानेवारी : मागील अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे 'गांधी गोडसे:एक युद्ध'.  महात्मा गांधी आणि त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे. गांधी आणि गोडसे हा वाद गेली अनेक वर्ष देशात सुरू आहे. अशा या दोन ऐतिहासिक व्यक्तींवर आधारित गांधी गोडसे सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि अभिनेत्री दीपक अंतानी सिनेमा प्रमुख भूमिकेत आहेत. चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसे साकारणार आहे तर दीपक अंतानी महात्मा गांधी साकारणार आहे. त्याचप्रमाणे सिनेमात जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीरेखा देखील पाहायला मिलणार आहे. देशातील महान नेत्यांच्या व्यक्तीरेखा पुन्हा एकदा गांधी गोडसे निमित्तानं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

गांधी आणि गोडसे हा सिनेमा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर देशभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं दिग्दर्शक राजकुमारी संतोषी हे जवळपास 9वर्षांनी कमबॅक करत आहेत. सिनेमाला ए.आर. रहमान यांचं संगीत लाभलं आहे. सिनेमाच्या ट्रेरलची प्रेक्षकांनी खूप वाट पाहिली होती. प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला आहे.

हेही वाचा - Vivek Agnihotri : 'यंदाचा ऑस्कर...' विवेक अग्निहोत्रींचा अनुपम खेर यांच्याबद्दल मोठा दावा

" isDesktop="true" id="812790" >

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये महात्मा गांधी आणि गोडसे यांच्यातील वैचारिक युद्ध दाखवण्यात आलं आहे. ट्रेलरची सुरूवातच भारत पाकिस्तान फाळणीनं दाखवण्यात आली आहे.  ट्रेलरमध्ये दमदार डायलॉग्स ऐकायला मिळत आहे. 'गांधी सरकार से बडा है...गांधी कानून से बडा है... गांधी देश से बडा है... महात्मा है... कैसे रोका जाए उसे?', या दमदार डायलॉगनं सुरूवात होतेय. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांचा 'कोई चाहे ते एक दिन में गोडसे बन सकता है, लेकीन गांधी बनने में उम्र लग जाती है...', या डॉयलॉगनंही सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

'गांधी गोडसे: एक युद्ध' हा सिनेमा 26 जानेवारीला रिलीज होतोय. तर 25 जानेवारीला शाहरुखचा पठाणही रिलीज होणार आहे. दोन सिनेमे आमने सामने येणार आहेत. आता प्रेक्षक कोणता सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करणार हे पाहावं लागणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Marathi news