मुंबई. 27 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेकदा आपल्या उत्तराने सोशल मीडियावर ट्रोलर्सची बोलती बंद करणारी नेहा सध्या अशाच एका कारणाने चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी नेहा धुपियाने बाळाला जन्म दिला आहे व दुसऱ्यांदा आई झाली आहे. नेहाने नुकताच सोशल मीडियावर बाळाला स्तनपान करतानाचा फोटो शेअर केला आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे ताहिरा कश्यपसोबत (Tahira Kashyap Khurrana) नेहाने आई बनण्याचा अनुभव शेअर केला आहे. नेहाने इन्स्टा चॅटच्या माध्यमातून आपला एक महिन्याची मुलगी मेहरला विसरून नवरा अंगद बेदीसोबत लॉन्ग ड्राइव्हसोबत गेल्याचं सांगितलं आहे. फिल्ममेकर ताहिरा कश्यपच्या‘7 सिंस ऑफ बींग मॉम’ या पुस्तकाविषयी बोलताना नेहा हे अनुभव शेअर केले आहेत. नेहाने बुधवारी इन्स्टावर बाळाला स्तनपान करताना एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती मुलाला शर्टच्या आतमध्ये ठेऊन स्तनपान करताना दिसत आहे. तसेच तिनं म्हटलं आहे की, #Freedomtofeed. नेहाने पहिल्या मुलीच्यावेळी सोशल मीडियावर स्तनपानाचा फोटो शेअर केला होता. ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होत. आता पुन्हा तिनं फोटो शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी फिल्ममेकर ताहिरा कश्यपने देखील तिच्या पुस्तकात एक खुलासा केला आहे. एकवेळ ती आपल्या मुलाला एका रेस्टारंटमध्ये विसरली होती. नेहाने देखील यावरूनच तिच्याबाबतीत देखील असं झाल्याचं सांगितलं आहे. ती म्हणतेय की, माहिती असेल की प्रेग्नेंशीमध्ये 40 दिवस घऱात राहण्यासाठी सांगतात. मी हे 40 दिवस कधी संपतायत याची दिवस रात्र वाट पाहत होते. मग काय मी ठरवलं चला ड्रायव्हला जाऊया. मग मी लगेल अंगदसोबत सी लिंकवर ड्रायव्हला गेले. माझ्याकडे दोन तास वेळ होता. कारण न्यू बेबीला दोन तासांनी दूध पाजायचे होते. मग काय 45 मिनिटातच मला नर्सचा कॉल आला. वाचा, या अभिनेत्रीचा काँग्रेसमध्ये प्रवेश; कुठल्या मुद्द्यांसाठी घेतला निर्णय पाहा पाच मिनिटे झाली नव्हती तोच फोन आवा. तेव्हा मला वाटलं की पाच मिनिट झाली नाहीत आणि फोन आला. तिनं सांगितलं की बाळ रडत आहे. मी तेव्ह म्हणाले की, बाळ तर माझ्याकडे आहे मग तुम्हाला कसं काय माहिती? तेव्हा आम्ही मागं वळून पाहिलं आणि बाळ गाडीमध्ये नसल्याचं आमच्या लक्षात आलं. आमच्या लक्षात आलं की, दोघही बाळाला तिथ विसरून आलो आहे. वाचा, हाय गर्मी ! तेजस्विनीच्या हॉटनेसने वाढवला सोशल मीडियाचा पार, पाहा PHOTO नेहा धुपियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने 2018 मध्ये अंगद बेदीशी लग्न केले. अंगद आणि नेहाने लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. अंगद आणि नेहाने लग्नाबद्दल कोणालाही कळू दिले नव्हते