जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / या अभिनेत्रीचा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रवेश; कुठल्या मुद्द्यांसाठी घेतला निर्णय पाहा

या अभिनेत्रीचा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रवेश; कुठल्या मुद्द्यांसाठी घेतला निर्णय पाहा

या अभिनेत्रीचा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रवेश; कुठल्या मुद्द्यांसाठी घेतला निर्णय पाहा

टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी आता राजकारणातही उतरली आहे. अभिनेत्री काम्या पंजाबी हिने बुधवारी, आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई. 27 ऑक्टोबर : बिग बॉस फेम टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी (Actress Kamya Punjabi) हिने आता राजकारणात प्रवेश केला आहे. काम्याने **(Kamya Punjabi join congress )**आज मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप तसंच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. एका मुलखतीमध्ये काम्याने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र योग्य वेळेची वाट पाहात असल्याची ती म्हणाली होती. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत काम्या पंजाबी म्हणाली की, देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात प्रेवश करायचा होता. मी ज्या मुद्दयांचा विचार करते, त्यावर काम करण्यासाठी राजकारणात आल्याचं तिन सांगितलं. यासोबतच मी महिला सबलीकरणावर अधिक भर देणार आहे. तसेच घरगुती हिंसाचाराचा सामना करत असलेल्या महिलांसाठी मला काम करायचं आहे. मी देखील घरगुती हिंसाचाराचा सामना केला आहे. त्यामुळेच खरं मी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मला कोणतही पद, अधिकार नको आहे तर मला फक्त काम करायचं आहे.

जाहिरात

शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या काम्या पंजाबी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप तसंच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रियंका गांधी आपल्या आदर्श असून त्यांच्यासारखं काम करायचं असल्याची इच्छाही काम्या पंजाबी यांनी व्यक्त केली. वाचा :  ‘मराठी इंडस्ट्रीतले मित्र असे कसे? ’ क्रांतीच्या समर्थनार्थ अभिनेत्याचं Tweet काम्या पंजाबी गेल्या दोन शतकांपासून हिंदी मालिका क्षेत्रात काम करत आहे. तिनं अनेक प्रसिद्ध मालिका तसंच रिएलिटी शोजमध्ये काम केलं आहे. बनू मैं तेरी दुल्हन, मर्यादा-लेकीन कब तक?, बेईंतहा अशा अनेक मालिकांमध्ये काम्याने काम केलं आहे. बिग बॉग या रिएलिटी शे मध्येही काम्या सहभागी झाली होती. वाचा : शुभंकरच्या खास Birthday चा VIDEO VIRAL ; पाहून तुम्हीही कराल कौतुक नुकताच करवा चौथच्या निमित्ताने काम्या पंजाबीने आपल्या पतीसोबत करवा चौथ साजरा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी काम्याने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. काम्या सोशल मी़डियावर नेहमी सक्रिय असते. अनेक मुद्दयांवर ती बोलतान दिसते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात