मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सैफ अली खान स्टारर वेब सीरीज 'तांडव' विरोधात FIR दाखल; गंभीर आरोपांसह बॅनची मागणी

सैफ अली खान स्टारर वेब सीरीज 'तांडव' विरोधात FIR दाखल; गंभीर आरोपांसह बॅनची मागणी

उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या, मथुरा आणि काशीसह प्रयागराजमध्ये साधु-संतांसह अनेक संघटनांनी या वेब सीरीजचा विरोध केला आहे. हजरतगंज कोतवालीमध्ये वेब सीरीज 'तांडव' बनवलेल्या आणि रिलीज करणाऱ्यांविरोधात गंभीर कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

लखनऊ, 17 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर वेब सीरीज 'तांडव'ला (Web Series Tandav) देशभरासह उत्तर प्रदेशातही मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'तांडव'मध्ये हिंदू देवी-देवतांचां अपमान आणि जातिगत भावना भडकवल्याच्या आरोपांसह ही वेब सीरीज बॅन करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या, मथुरा आणि काशीसह प्रयागराजमध्ये साधु-संतांसह अनेक संघटनांनी या वेब सीरीजचा विरोध केला आहे. हजरतगंज कोतवालीमध्ये वेब सीरीज 'तांडव' बनवलेल्या आणि रिलीज करणाऱ्यांविरोधात गंभीर कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हजरतगंज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ उपनिरिक्षक अमरनाथ यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांडव वेब सीरीज रिलीज करणारे OTT प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओचे ओरिजनल कंटेंट हेड इंडिया अपर्णा पुरोहित, तांडव वेब सीरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, प्रोड्युसर हिमांशू कृष्णा मेहरा आणि लेखक गौरव सोलंकीविरोधात आणि इतर 5 लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेब सीरीज तांडवच्या पहिल्या एपिसोडमध्ये 17व्या मिनिटाला दाखवण्यात आलेल्या हिंदू देवी-देवतांना अमर्याद पद्धतीने दाखवून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसंच महिलांचा अपमान केल्याने वेब सीरीजचा हेतू एका समुदायाच्या धार्मिक भावना भडकवण्याचं, एफआयआरमध्ये म्हटलं आहे. या सीरीजचा व्यापक प्रसार समाजासाठी हानिकारक असल्याचं म्हणत, वेब सीरीजविरोधात एफआयआर नोंदवून कायदेशीर कायवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

(वाचा - '...जय सियाराम!' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल)

दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे नेते राम कदम यांनी, या सीरिजमध्ये भगवान शंकराची थट्टा केलेला भाग हटवायला हवा. अभिनेता जिशान अयूब याला यासाठी माफी मागावी लागेल. तसंच सीरिजचे निर्माता दिग्दर्शक यांनी हात जोडून आणि गुडघे टेकून माफी मागायला हवी, असंही ते म्हणाले.

त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दाखल करीत सीरिजचे निर्माता, निर्देशक आणि अभिनेत्यांविरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.

First published:

Tags: Saif Ali Khan