मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'...जय सियाराम!' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल

'...जय सियाराम!' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल

अक्षय कुमार अनेकदा सिनेमांऐवजी इतर कारणांनी चर्चेत असतो. आताही असंच झालं आहे.

अक्षय कुमार अनेकदा सिनेमांऐवजी इतर कारणांनी चर्चेत असतो. आताही असंच झालं आहे.

अक्षय कुमार अनेकदा सिनेमांऐवजी इतर कारणांनी चर्चेत असतो. आताही असंच झालं आहे.

मुंबई, 17 जानेवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अयोध्या (Ayodhya) इथं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राम मंदिराचं (Ram Mandir) निर्माण करणार आहे. देशभरातून लोकांना त्यासाठी इच्छा आणि कुवतीनुसार निधी देण्याचं आवाहन केलं जात आहे. हे आवाहन केवळ राजकारणी नाही तर सेलिब्रिटीही करत आहेत असं दिसतं आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood celebrity) अक्षय कुमार (Akshay Kumar) यानं ट्विटरवर (Twitter) लोकांना हे आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे त्यानं स्वतःसुद्धा या निधीत योगदान दिलं आहे. हे आवाहन करण्यासाठी त्यानं ट्विटरवर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. लोकांनी मात्र त्याला त्यावरून विविध टोमणे मारत अगदी ट्रोलही करणं सुरू केलं आहे.

अक्षयच्या या व्हिडीओला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देणं सुरू केलं आहे. अक्षयनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की 'ही मोठीच आनंदाची बाब आहे, की अयोध्येमध्ये आपल्या श्रीरामाच्या भव्य मंदिराचं निर्माण सुरू झालं आहे. आता योगदानाची पाळी आपली आहे. मी सुरुवात केली आहे. आता आशा आहे, तुम्हीही सोबत याल. जय सियाराम.'

एका युजरनं शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत अक्षयला जाब विचारला आहे. दुसऱ्यानं म्हटलं आहे, की 'सर, खूप चांगली गोष्ट बोललात. मात्र निधी चांगल्या शाळा (School) आणि हॉस्पिटल्स (Hospital) उभारण्यासाठी गोळा केला असता तर बरं झालं असतं. कारण संकटात मंदिराची नाही तर या गोष्टींची जास्त गरज पडत असते. कोरोनाकाळात हॉस्पिटल कामाला आले, मंदिरं नाही.' अजून एक युजर म्हणाला, अक्षयजी इथं जेवायला मिळणंच अवघड आहे आणि तुम्ही राम मंदिरात योगदान देण्याबाबत बोलत आहात. हे चुकीचं आहे, नाही का?' अनेकांनी तर या ट्विटला अक्षयच्या आगामी फिल्मचं प्रमोशनच म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Akshay Kumar, Ram Mandir, Twitter