'सा रे गा मा पा' स्पर्धक राहिलेल्या गायकाने वापरले मोदींविरोधात अनुचित शब्द, FIR दाखल

'सा रे गा मा पा' स्पर्धक राहिलेल्या गायकाने वापरले मोदींविरोधात अनुचित शब्द, FIR दाखल

भारतात 'सा रे गा मा पा' या रिअ‍ॅलिटी शोमधील दिसलेल्या मेनुल एहसान नोबलवर गंभीर आरोप करत त्याच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे : भारतात 'सा रे गा मा पा' या रिअ‍ॅलिटी शोमधील दिसलेला आणि यामध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारणारा स्पर्धक मेनुल एहसान नोबल (Mainul Noble) याच्या अडचणी वाढल्या आहेत. नुकतीच अशी बाब समोर आली आहे की, बांग्लादेशी गायक मेनुल एहसान नोबलवर गंभीर आरोप करत त्याच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत अशोभनिय शब्द वापरल्याप्रकरणी ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मेनुलने गेल्यावर्षी बांग्ला शो 'सा रे गा मा पा' (Show Sa Re Ga Ma Pa)  मध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये त्याने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती तर यामध्ये तो सेकंड रनर-अप होता.

मेनुल एहसान नोबल यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्रिपुरा पोलिसांना बांग्लादेशमधील या गायकाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार गुजरातमधील गांधीनगरच्या पंड‍ित दीनदयाल पेट्रोल‍ियम यून‍िव्हर्स‍िटीमधील एका विद्यार्थ्याने मेनुल एहसान नोबल विरोधात तक्रा केली आहे. या अहवालानुसार या तक्रार दाखल करणाऱ्या मुलाचे नाव सुमन पाल असून तो मेनुलच्या टिप्पणीवरून अत्यंत नाराज आहे.

(हे वाचा-कोरोनापासून वाचण्यासाठी मलायकानं शोधली खास थेरपी, चाहत्यांसाठी VIDEO केला शेअर)

या अहवालात सायबर क्राइम सेलचे दक्ष‍िणी त्र‍िपुरा पोल‍ीस अधीक्षक जल स‍िंह मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, या विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर बांग्‍लादेशी सिंगर मेनुल एहसान नोबेलवर कलम 500, 504, 505 आणि कलम 153 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती देखील मिळते आहे की, मेनुल त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेचं कारण बनला आहे. या प्रकरणात मेनुलची अद्याप कोणती प्रतिक्रिया आली नाही आहे.

(हे वाचा-मुंबईहून बिहारला पोहोचली गर्भवती महिला, बाळाचं नाव ठेवलं 'सोनू सूद')

मेनुल भारतीय रिअ‍ॅलिटी शोचा हिस्सा होता असला तरी तो फारशी ओळख कमवू शकला नव्हता. मात्र देश-विदेशात होणाऱ्या काही कॉन्सर्टमध्ये तो पाहायला मिळतो.

First published: May 29, 2020, 8:20 AM IST

ताज्या बातम्या