मुंबईहून बिहारला पोहोचली गर्भवती महिला, बाळाचं नाव ठेवलं 'सोनू सूद'

मुंबईहून बिहारला पोहोचली गर्भवती महिला, बाळाचं नाव ठेवलं 'सोनू सूद'

सोनूच्या मदतीनेच एक महिला बिहारमधील तिच्या गावी पोहोचली. ही महिला गरोदर होती आणि तिथे पोहोचल्यानंतर एकदम अनोख्या पद्धतीने तिने सोनूचे आभार मानले आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 मे : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अनेकांच्या कौतुकाचं कारण बनला आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू आणि त्याची टीम अतोनात प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे. त्याचप्रमाणे गरजूंना अन्नधान्य, रेशन देण्याचे कामही सोनू करत आहे. सोशल मीडियावर सोनूचे खूप कौतुक देखील होत आहे. 'रिअल हिरो' म्हणून त्याला संबोधले जात आहे. सोनूच्या मदतीनेच एक महिला बिहारमधील तिच्या गावी पोहोचली. ही महिला गरोदर होती आणि तिथे पोहोचल्यानंतर एकदम अनोख्या पद्धतीने तिने सोनूचे आभार मानले आहेत.

सोनूनेच या घटनेसंदर्भात खुलासा केला आहे. बॉम्बे टाइम्सबरोबर केलेल्या चर्चेमध्ये सोनूने यासंदर्भात माहिती दिली आहे. तो असं म्हणाला की, 'मी ज्या लोकांना त्यांच्या घरी पाठवलं आणि त्यातील एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. तिने माझ्या नावावर तिच्या मुलाचं नाव ठेवलं आहे.

(हे वाचा-मजुरांच्या मदतीसाठी धावलेल्या सोनू सूदने मागितली माफी, वाचा काय आहे कारण)

यावेळी सोनूने असं देखील सांगितले की, 'मी माझ्या टीमबरोबर मिळून 12 मजुरांच्या एका ग्रुपला मुंबईहून दरभंगासाठी पाठवले होते. ज्यामध्ये दोन गर्भवती महिला होत्या. यामधील एकीला तिथे पोहचल्यावर बाळ झालं आणि तिने ही खूशखबर मला फोनवरून कळवली होती.'

सोनू पुढे म्हणाला की, 'तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की मुलगा झाला आहे आणि त्याचे नाव सोनू सूद असे ठेवले आहे.  जेव्हा मी विचारलं सूद कसं काय तो तर श्रीवास्तव होईल ना? हे ऐकून ती महिला म्हणाली की मुलाचं पूर्ण नाव सोनू सूद श्रीवास्तव असं ठेवण्यात आलं आहे.'

या महिलेने जे अनोख्या पद्धतीने सोनूचे आभार मानले आहेत त्यामुळे त्याला खूप गहिवरून आले होते.

ट्रम्प, झुकरबर्ग आणि ट्विटर यांच्यात का रंगलय शाब्दिक युद्ध? वाचा काय आहे वाद

सोनुचे काही प्रवाशांनी ट्विटरवर आभार देखील मानले. त्यांना उत्तर देण्याचं काम देखील सोनू करत आहे. एका युजरने सोनूला टॅग करत असे लिहिलं आहे की, 'सर आम्ही व्यवस्थित निघालो आहोत. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला अपडेट करत राहीन. तुम्हाला खूप सारं प्रेम'. यावर सोनुने रिप्लाय देखील दिला आहे. 'सांगितलं होतं ना उद्या आईच्या हातचं जेवण जेवशील. बिहारला पोहचून सर्वांना सलाम सांग',   असा रिप्लाय सोनूने दिला आहे.

लस आली तरी कोरोनाव्हायरस पाठलाग सोडणार नाही; तज्ज्ञांचा दावा

First published: May 28, 2020, 3:18 PM IST
Tags: Sonu Sood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading