मुंबई, 28 मे : आपल्या फिटनेस साठी प्रसिद्ध असणारी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) लॉकडाऊनच्या काळात स्वस्थ राहण्याला अधिक पसंती देत आहे. मलायका तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अनेक फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. काही फिटनेस टिप्स सुद्धा ती शेअर करत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने ‘व्हिटॅमिन डी’ चे महत्त्व सांगितले आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर मलायका अरोराने असं म्हटलं आहे की, ‘मी रोज उन्हात उभी राहून व्हिटॅमिन डी घेते. सकाळी उन्हात उभं राहणं खुप फायदेशीर आहे’.
या कृतीला मलायकाने ‘व्हिटॅमिन डी थेरपी’ असं म्हटलं आहे. सूर्याची किरणे व्हिटॅमिन डी चे महत्वाचे स्रोत आहेत. डॉक्टर देखील सकाळी सूर्याची किरणे अंगावर घेण्याचा सल्ला देतात. सध्या लॉकडाऊनमुळे घरात बंद असणारे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्स बरोबर जोडले गेले आहेत. मलायकाने याआधी देखील लाडू बनवण्याचा, साफ सफाई करण्याचा व्हिडीओ शेअर केला होता. त्याचप्रमाणे तिचे काही फोटो व्हायरल देखील होत असतात. विशेषतः अर्जून कपूर (Arjun Kapoor) बरोबर तिचे खूप फोटो व्हायरल होतात.