मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Urfi Javed: 'भारत म्हणजे अफगाणिस्तान...'; FIR दाखल झाल्यानंतर उर्फीची प्रतिक्रिया चर्चेत

Urfi Javed: 'भारत म्हणजे अफगाणिस्तान...'; FIR दाखल झाल्यानंतर उर्फीची प्रतिक्रिया चर्चेत

उर्फी जावेद

उर्फी जावेद

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद विरोधात FIR दाखल करण्यात आले आहे. त्याला उर्फीने आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 10 नोव्हेंबर : बिग बॉस ओटीटी फेम  उर्फी ​​जावेद तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. त्यामुळे उर्फीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिच्या अतरंगी आणि विचित्र ड्रेसिंगमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते.उर्फीला ड्रेसिंग सेन्सवरुन अनेकदा ट्रोल केले जाते. मात्र ती याकडे दुर्लक्ष करत आपली क्रिएटिव्हिटी दाखवत असते. वेगवेगळ्या वस्तूपासून उर्फी कधी कोणता ड्रेस बनवेल याचा काही नेम नसतो. नेहमीच काहीतरी नवीन कपडे बनवण्याचा उर्फीचा उद्देश खरा ठरतो आणि तिची फॅशन, तिचे कपडे पाहून चाहते कायमच थक्क होतात. आता उर्फी पुन्हा नवीन कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण तिचा आगळावेगळा ड्रेस नसून तिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले हे आहे.

आपल्या फॅशनमुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेदविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर दिल्ली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे, परंतु तक्रारदाराचे नाव अद्याप समजले नाही. झीनत अमानच्या 'हाय ही ये माबूलगी' या गाण्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या रिमेकमध्ये उर्फीने लोकांच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा - Sai tamhankar : 'हा कसला स्ट्रगल'! 'त्या' पोस्टमुळे सई ताम्हणकर होतेय ट्रोल; काय आहे कारण पाहा

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, उर्फी जावेदने ज्या प्रकारचा मजकूर दिला आहे तो चुकीचा आहे. अशी लैंगिक सामग्री इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करणे चुकीचे आहे. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेदने या तक्रारीवर अप्रतिम प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी ती म्हणाली , ''हे माझ्यासाठी खूप विडंबनात्मक आहे. लोक मला सांगतात की मला लक्ष देण्याची गरज आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना माझ्या नावाने प्रसिद्धी मिळवायची  आणि लक्ष वेधून घ्यायचे आहे. अभिनेत्री म्हणाली की तिला असे वाटते की लवकरच असे घडेल जेव्हा बलात्कार करणार्‍यांविरुद्ध इतक्या एफआयआर होणार नाहीत जेवढ्या आमच्या विरोधात केल्या जात आहेत.''

उर्फी जावेद म्हणाली की ती कुठला ड्रेस घालते, काय घालते हा सर्वस्वी तिचा अधिकार आहे.  ती पूर्णपणे तिची निवड आहे. अभिनेत्री म्हणाली की भारत म्हणजे  तालिबान किंवा अफगाणिस्तान नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणी नियंत्रण ठेवू शकत नाही. मुलीने काय परिधान करावे आणि काय नाही हे ती ठरवेल.

उर्फी दररोज हटके ड्रेस परिधान करून मीडियासमोर येत असते. ती कधी काचेपासून, कधी वायरीपासून कधी ब्लेडपासून तर कधी गोणपाटपासून बनलेले ड्रेस परिधान करून सर्वांनाच थक्क करत असते. काहींना तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटतं तर काही लोक तिला वाईटरित्या ट्रोल करत असतात.

First published:

Tags: Actress, Fashion, Model, Urfi Javed