जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / उर्फी जावेदवर भडकले प्रसिद्ध कॉमेडियन, म्हणाले 'न्यूजमध्ये राहण्यासाठी ती...'

उर्फी जावेदवर भडकले प्रसिद्ध कॉमेडियन, म्हणाले 'न्यूजमध्ये राहण्यासाठी ती...'

उर्फी जावेद, सुनील पाल

उर्फी जावेद, सुनील पाल

उर्फी जावेद नाव आता तुमच्यासाठी काही नवीन नाही. तिचं नाव येताच पहिली तिची अतरंगी फॅशन डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. उर्फी तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 नोव्हेंबर: ‘बिग बॉस OTT’ फेम उर्फी जावेद नेहमीच आपल्या अतरंगी आऊटफिट्समुळे चर्चेत असते. ती सतत विविध गोष्टींपासून ड्रेस बनवण्याचे एक्सपिरिमेंट करत असते. दररोज नवनवीन आणि अतरंगी कपड्यांमध्ये उर्फी पहायला मिळते. प्रत्येक वेळी नव्या लुकमध्ये येऊन ती नेटकऱ्यांना हैराण करत असते. उर्फीला तिच्या अतरंगी फॅशमुळे अनेकवेळा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अशातच आता उर्फीविषयी कॉमेडियन सुनील पालने एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. उर्फी जावेदने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एका महिलेचा खुलासा केला आहे. याच महिलेनं उर्फीविषयी तक्रार दाखल केली होती. आता याविषयी कॉमेडियन सुनील पालने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सुनील पालने म्हटलं, ‘उर्फी जावेद वेडी झाली आहे का?, मी बर्‍याच दिवसांपासून उर्फीला पाहतोय, उर्फीला हेच वाटतं होतं की तिच्या विरोधात कोणीतरी केस करावी ज्यामुळे ती चर्चेत येईल. कमी कपडे घालून उर्फी जावेद हे नाव घेतले. ती ज्या प्रकारे आमच्या पवित्र मुस्लिम नावाशी खेळत आहे. मला ते आवडत नाही.’

जाहिरात

सुनील पालने पुढे म्हटलं, ‘मला वाटते की आपण सर्वांनी मिळून बहिणीला समजावून सांगितले पाहिजे की अवयव दाखवल्याने तुम्हाला दोन-चार दिवस यश मिळेल, पण तुम्ही कधीही शिखरावर पोहोचू शकणार नाही. ती खूप मेहनत करू शकली असती, पण तिने लहान कपडे घालण्याचा मार्ग स्वीकारला. न्यूजमध्ये राहण्यासाठी ती न्यूड कपडे घालते. एका भावाच्या नात्याने मी सांगेल की बाहेर रस्त्यावर येताना कपडे घाल’. आता सुनील पालच्या या व्हिडीओवर उर्फी काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, उर्फी जावेद नाव आता तुमच्यासाठी काही नवीन नाही. तिचं नाव येताच पहिली तिची अतरंगी फॅशन डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. उर्फी तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात