Home /News /entertainment /

'न्याय द जस्टिस...', सुशांतनंतर आता रिया चक्रवर्तीवर देखील बनतोय सिनेमा

'न्याय द जस्टिस...', सुशांतनंतर आता रिया चक्रवर्तीवर देखील बनतोय सिनेमा

अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) सिनेमा बनवण्याची तयारी करण्यात आली आहे. या सिनेमाच्या टायटलसह काही गोष्टी समोर आल्या आहेत.

    शिखा धारीवाल, मुंबई, 03 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात त्याच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवि (Rhea Chakraborty) गंभीर आरोप करत तिच्याविरोधात एफआयआर दाखल केली. त्यानंतर रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढल्या आहेत. दिवसेंदिवस रियावर करण्यात येणाऱ्या आरोपांची संख्या वाढत आहेत. सोशल मीडिया आणि काही न्यूज चॅनेलवर देखील काही धक्कादायक खुलासे केले जात आहेत. दरम्यान आता अशी बातमी समोर येत आहे की रियावर सिनेमा बनवण्याची तयारी करण्यात आली आहे. या सिनेमाच्या टायटलसह काही गोष्टी समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सुशांतवर सिनेमा बनणार असल्याचेही वृत्त समोर आले होते. या सिनेमाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले होते. दरम्यान सुशांतच्या कुटुंबीयांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सुशांतच्या कुटुंबीयांच्या वकिलांनी याप्रकरणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असे सांगितले होते की, सुशांतच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय कोणीही सिनेमा बनवू शकत नाही. पण आता रियाच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या सिनेमाचे टायटल ‘न्याय द जस्टिस’...असे असण्याची शक्यता आहे. वकील अशोक सरोवगी यांची पत्नी सरला सरोवगी सुशांत - रिया केसवर आधारित सिनेमा बनवणार आहे आणि याची शूटिंग देखील सुरू झाली आहे. (हे वाचा-'मुंबई PoK सारखी का वाटू लागली आहे?' संजय राऊत यांच्या टीकेनंतर कंगनाचा सवाल) अशी माहिती समोर येत आहे की, चित्रपटाची स्क्रीप्ट वकील अशोक सरोवगी यांच्या डायरीतून बनली आहे. या सिनेमात टीव्ही अभिनेता जुबेर के खान सुशांतच्या भूमिकेत तर अभिनेत्री श्रेया शुक्ला रियाच्या भूमिकेत असेल, अशी देखील माहिती मिळाली आहे. 1 सप्टेंबरपासून याचे शूटिंग सुरू झाले असून मुंबईतील मड च्या आसपास शूटिंग सुरू आहे. (हे वाचा-'सुशांतच्या कुटुंबाने नव्हते म्हटले आत्महत्या आहे, पोलिसांनी जबरदस्ती घेतली सही') गेल्या काही दिवसात सुशांत सिंह राजपूतवर दोन निर्मात्याद्वारे सिनेमा बनवण्यात येणार असल्याची बाब समोर आली होती. या सिनेमात सुशांतसारख्या दिसणाऱ्या एका टिकटॉक स्टारला मुख्य भूमिका देण्याचे वृत्त समोर आले होते. मात्र कुटुंबाने याबाबत परवानगी नाकारल्याने सिनेमा वादात सापडला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या