Home /News /entertainment /

PM मोदींवर टीका करणं दीपाली सय्यद यांना पडलं महागात, अभिनेत्री विरोधात पोलिसात तक्रार दाखल

PM मोदींवर टीका करणं दीपाली सय्यद यांना पडलं महागात, अभिनेत्री विरोधात पोलिसात तक्रार दाखल

दीपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणं आता त्यांना चांगलच महागाच पडलं आहे.

    मुंबई, 28 मे- Deepali sayed Latest News : आपल्या डान्सच्या कौशल्यानं सा-यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद ( deepali syed ) या समाज कार्यत देखील सक्रीय दिसतात. याशिवाय दीपाली सय्यद (deepali sayed politician ) सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतात. तसेच आलीकडे त्यांचा राजकारणात देखील सहभाग वाढला आहे. मागच्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपवर सोशल मीडियावरून जोरदार निशाणा साधताना दिसतात. कालच दीपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणं आता त्यांना चांगलच महागाच पडलं आहे. कारण यामुळं दीपाली सय्यद यांच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्द वापरत टीका केली होती. त्यांचे ट्वीट सोशल मीडियावर चांहगलेच चर्चेत आलं होत. त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. दीपाली सय़्यद यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, 'किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा... (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्या भारताने पाहिला नसेल" अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती. दीपाली सय्यद यांच्या टीकेनंतर त्यांच्यावर ओशिवारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिपण्णी केल्या प्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे या तक्रारीनंतर पोलीस काय कारवाई करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. वाचा-'या' ठिकाणी शूट होणार नेहा-यशचं ग्रॅन्ड वेडिंग,'तुला पाहते रे' नंतरचं सगळ्यात... दीपाली सय्यद यांनी  यापूर्ट्वीवी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत एक ट्वीट केलं होतं.  मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही...असा टोला त्यांनी राज ठाकरेंना  ट्वीटमधून लावला होता. तसेच दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्याविषयी देखील एक ट्वीट केलं होतं. दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको"..अशा शब्दात त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. वाचा-स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेतील रणदीप हुड्डाचा First Look रिलीज दीपाली यांनी अभिनयाशिवाय राजकारणातीह प्रवेश केला आहे. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य त्या करत असतात. पुरगस्तांची मदत असो किंवा मग मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणं असो असे अनेक कार्यांत दीपाली यांनी लोकांची मदत केली आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Pm modi, Shivsena

    पुढील बातम्या