मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Farhan-Shibani Dandekar च्या हळदीला रिया चक्रवर्तीची उपस्थिती, Video आला समोर

Farhan-Shibani Dandekar च्या हळदीला रिया चक्रवर्तीची उपस्थिती, Video आला समोर

Farhan-Shibani Dandekar Wedding:फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांची आज, 17 फेब्रुवारीला हळद होती. या कार्यक्रमाला अभिनेत्री रिया चक्रवर्तीने उपस्थिती लावली होती.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 17 फेब्रुवारी- Farhan-Shibani Dandekar Wedding : गेल्या काही काळापासून बॉलीवूडमध्ये चित्रपटांपेक्षा लग्नांचीच चर्चा अधिक आहे. विक्की कौशल, कतरिना कैफ, अंकिता लोखंडे आणि मौनी रॉय यांच्यानंतर आणखी एक जोडपं आता लग्नबंधनात अडकणार आहे. प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर ( Farhan Akhtar ) आणि शिबानी दांडेकर ( Shibani Dandekar ) हे लग्न करत आहेत.त्यांचा विवाहसोहळा 19 फेब्रुवारीला होणार असल्याचे वृत्त आहे.

आता फरहान आणि शिबानीच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. फरहानच्या घरी हळदी समारंभ होत आहे. त्यामुळे त्याच्या घरी बॉलीवूड सेलेब्सची मांदियाळी दिसत आहे. या सेलेब्समध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीसुद्धा आहे. फरहान आणि शिबानीच्या हळदी समारंभाला रियाने हजेरी लावली असून तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रिया फरहानच्या घरी जाताना दिसत आहे.

वाचा-फरहान -शिबानी करणार मराठी पद्धतीनं लग्न, हनी इराणींनी दिलं कन्फर्मेशन

रियाला फरहानच्या घरी जाताना पाहिल्यानंतर पापाराजी जोरजोरात रियाला बोलावताना दिसत आहेत. परंतु, रियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली दिसत नाही. रिया गाडीतून उतरून गुपचूप घरात गेली. मिळालेल्या माहितीनुसार, आज संगीताचा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये रिया परफॉर्म करणार आहे. दुसरीकडे आपल्या विवाहाबाबत फरहान आणि शिबानी गप्पच आहेत.

दरम्यान, फरहान आणि शिबानीच्या जवळच्या मित्राने सांगितले की, ते दोघेजण लग्नसोहळा शक्यतो खासगीच ठेवण्याच्या मानसिकतेत आहेत. याचा अर्थ फरहान आणि शिबानी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा उरकणार आहेत. यामध्ये केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यच उपस्थित राहणार आहेत. शबाना आणि जावेद अख्तर या विवाह सोहळ्यामुळे खूश असून त्यांनी फरहान आणि शिबानीला आशीर्वाद दिले आहेत.

वाचा-Video : Bigg Boss फेम मीनल शाहचं शिवजयंतीनिमित्त विशेष फोटोशुट चर्चेत

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर मागच्या चार वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांनी या नात्याला नाव द्यायचे ठरवलं आहे. दोघेही आयुष्यभरासाठी 19 फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Farhan akhtar, Rhea chakraborty