जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Video : Bigg Boss फेम मीनल शाहचं शिवजयंतीनिमित्त विशेष फोटोशुट चर्चेत

Video : Bigg Boss फेम मीनल शाहचं शिवजयंतीनिमित्त विशेष फोटोशुट चर्चेत

Video : Bigg Boss फेम मीनल शाहचं शिवजयंतीनिमित्त विशेष फोटोशुट चर्चेत

शिवजयंतीनिमित्त बिग बॉस मराठी तीन (bigg boss marathi 3 ) पर्वातील मीनल शाह (meenal shah) हिनं एक फोटोशुट केलं आहे. हे मराठमोळं फोटशुट सोशल मीडियावर चांगल चर्चेत आलं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी- येत्या शनिवारी म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे. यासाठी सगळीकडं जोरात तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर देखील शिवजयंतीनिमित्त विविध व्हिडिओ लक्षवेधून घेत आहेत. शिवजयंतीनिमित्त बिग बॉस मराठी तीन (bigg boss marathi 3 ) पर्वातील मीनल शाह (meenal shah) हिनं एक फोटोशुट केलं आहे. हे मराठमोळं फोटशुट सोशल मीडियावर चांगल चर्चेत आलं आहे. मीनल शाहनं इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिनं भगव्या रंगाची नऊवारी नेसली आहे. शिवाय नाकात नथ आणि पारंपारिक दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. तिनं हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देत सादर करत आहोत. #शिवजयंती विशेष फोटोशूट❤️🙏🏼 मीनल शाहच्या फोटोशुटवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. एकाने म्हटलं आहे की, आता खरी शोभतेस महाराष्ट्राची वाघीण 🔥🔥… जय भवानी जय शिवाजी तर दुसऱ्याने म्हटंल आहे की, जय शिवराय 🙏❤️..आणखी एकानं म्हटलं आहे कीमीनल खरी वाघीण आहेस😍😍😍😍. चाहत्यांकडून तिच्या लुकचे कौतुक होत आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव सुरूच आहे.

जाहिरात

बिग बॉसच्या घऱात मीनल शाह शेवटच्या पाचमध्ये जागा मिळवण्यास यशस्वी झाली.तिच्या खेळाचे विशेष कौतुक झालं. या घरात तिच्या आणि सोनाली पाटीलच्या मैत्रिचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं. घरातून बाहेर आल्यानंतर देखील मीनलने सोनाली पाटीलची तिच्या घरी जाऊन भेट घेतली. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. वाचा- अमृता फडणवीस हातात लाटणं घेऊन देवेंद्रजी यांच्यासाठी म्हणतात हे गाणं मीनल मुळची मुंबईकर मीनलचा जन्म मुंबईत झाला आहे. ती लहान असतानाच तिचे आई आणि वडील दोघेही विभक्त झाले होते त्यामुळे मीनल आणि तिच्या भावाचा सांभाळ तिच्या आईनेच केला आहे. वडील गुजराती जरी असले तरी तिची आई मराठी असल्याने त्या दोघांचे शिक्षण मराठी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात