जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Farhan Akhtar-Shibani Dandekar महाराष्ट्रीयन पद्धतीनं करणार लग्न, अभिनेत्याच्या आईकडून मिळालं कन्फर्मेशन

Farhan Akhtar-Shibani Dandekar महाराष्ट्रीयन पद्धतीनं करणार लग्न, अभिनेत्याच्या आईकडून मिळालं कन्फर्मेशन

Farhan Akhtar-Shibani Dandekar महाराष्ट्रीयन पद्धतीनं करणार लग्न, अभिनेत्याच्या आईकडून मिळालं कन्फर्मेशन

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar ) लवकरच लग्नबंधनात (Wedding) अडकणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल फरहानची आई हनी इराणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar ) लवकरच लग्नबंधनात (Wedding) अडकणार असल्याची चर्चा आहे. 19 फेब्रुवारील दोघेही महाराष्ट्रीयन पद्धतीनं लग्नगाठ बांधणार आहेत. 17 फेब्रुवारीला या दोघांचा हळदी समारंभ आहे. या कार्यक्रमाला **(Farhan Akhtar Wedding )**कुटुंबातील सदस्य आणि दोघांचा जवळचा मित्रपरिवार उपस्थिती लावणार आहे. फरहान अख्तरची आई हनी इराणी यांनी याबद्दल माहिती दिली आहे. हनी इराणी यांनी लग्नाच्या बातमीवर केला शिक्कामोर्तब फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर मागच्या चार वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांनी या नात्याला नाव द्यायचे ठरवलं आहे. दोघेही आयुष्यभरासाठी 19 फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये फरहानची आई हनी इराणी यांनी सांगितलं की, लग्नापूर्वीच्या सर्व कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. घरातच सर्व आयोजन करण्यात आलं आहे. शिवानीच्या जवळच्या मित्र परिवाराने मेंदी सोहळ्याचे आयोजन केलं आहे. 17 फेब्रुवारीला म्हणजे आज मेंदी सोहळा आहे. सगळे आनंदात आहेत. लग्न 19 फेब्रुवारीला होणार आहे. लग्न पूर्ण खासगी ठेवलं जाणार आहे. कुटुंबातील सदस्य आणि जवळचा मित्रपरिवार या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितलं. वाचा-  Berlin Film Festival मध्ये आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ लुकनं वेधलं लक्ष रिपोर्ट्सनुसार, लग्न फरहान अख्तरच्या खंडाळ्याच्या फार्महाऊसवर होणार होते. याबद्दल हनी इराणी यांनी विचारलं असता त्या म्हणाल्या की, मी याविषयी आता काही सांगू शकत नाही. मीडिया या ठिकाणी पोहचून काही फोटो क्लि करेल म्हणून याबद्दल मी सांगू शकत नाही. हा सोहळा पूर्णपणे खासगी म्हणजे प्रायव्हेट ठेवण्यात येणार आहे आणि तो तसाच राहुद्या असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. वाचा- अमृता फडणवीस हातात लाटणं घेऊन देवेंद्रजी यांच्यासाठी म्हणतात हे गाणं अशी चर्चा आहे दोघेही मराठमोळ्या म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीनं लग्न करणार आहेत. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर दोघं मिळून लग्नाची रिसेप्शन पार्टी देण्याची योजना आखत आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील जवळचा मित्रपरिवाराचा समावेश असणार आहे. याशिवाय कुटुंबातील सदस्य देखील या रिसेप्शन पार्टीमध्ये सहभागी होणार आहेत. चाहते या दोघांच्या लग्नाची अतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात