फरदीनचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क; पुनरागमनासाठी 35 किलो वजन केलं कमी

फरदीनचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क; पुनरागमनासाठी 35 किलो वजन केलं कमी

सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्याचे फोटो आणि व्हिडीओज पाहून नेटकरी फरदीनची खिल्ली उडवायचे. बॉडी शेमिंगमुळं (Body shaming) तो नैराश्येत देखील गेला होता.

  • Share this:

मुंबई 8 मार्च: फरदीन खान (Fardeen Khan) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जायचा. परंतु गेले काही वर्ष तो सिनेसृष्टीच्या लखलखत्या दुनियेपासून दूर आहे. शिवाय वाढलेल्या वजनामुळं त्यानं सेलिब्रिटी पार्ट्यांमध्येही जाणं सोडलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्याचे फोटो आणि व्हिडीओज पाहून नेटकरी त्याची खिल्ली उडवायचे. बॉडी शेमिंगमुळं (Body shaming) तो नैराश्येत देखील गेला होता. परंतु या सर्वांवर मात करत आता पुन्हा एकदा त्यानं बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यासाठी त्यानं केलेलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वजण चकित झाले आहेत. (Fardeen Khan Transformation)

फरदीननं अलिकडेच एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं बॉडी ट्रान्सफॉर्मेशचा अनुभव देखील सांगितला. तो म्हणाला, “वाढलेल्या वजनामुळं चाळीतच मी जणू 70 वर्षांचा झालो आहे असं वाटायचं. थोडं चाललं की धाप लागायची. घराबाहेर पडलो की सतत लोकांच्या नजरा मला चिडवतायेत असे भास व्हायचे. त्यामुळं दिवसेंदिवस अधिकच मी नैराश्येत जात होतो. पण एके दिवशी मी यासर्वांत बाहेर येण्याचा निर्णय घेतला. जिममध्ये जाऊन ट्रेनिंग सुरु केलं. फास्ट फूड खाणं केराच्या टोपलीत टाकून दिलं. अन् एकमेव ध्येय ठेवलं वजन कमी करायचं आहे. अन् काही वर्षांत मी 35 किलो वजन कमी केलं. आता पुन्हा एकदा मी स्वत:ला दुसरी संधी देण्याचा विचार करतोय.”

अवश्य पाहा - Fat अभिनेत्री झाली Fit; जिम ऐवजी डान्स करुन वजन केलं कमी

फरदीन हा प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा आहे. त्यानं 1998 साली ‘प्रेम अंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘जंगल’, ‘प्यार तुने क्या किया’, ‘लव्ह के लिये कुछ भी करेगा’, ‘हम हो गये आपके’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं. अनेक वर्ष स्ट्रगल केल्यानंतर सलमान खानच्या ‘नो एण्ट्री’ या चित्रपटातून तो खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला होता. पण त्याचं हे यश दिर्घकाळ टिकलं नाही. हे बेबी या चित्रपटानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. अन् पाहता पाहता त्याला चित्रपट मिळणं बंद झाला. सध्या तो बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे.

Published by: Mandar Gurav
First published: March 8, 2021, 10:16 AM IST

ताज्या बातम्या