जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / चाहत्यांना बिग बींच्या वाढदिवशी मिळणार खास भेट, फक्त 'इतक्या' रुपयांमध्ये बघता येणार 'गुडबाय'

चाहत्यांना बिग बींच्या वाढदिवशी मिळणार खास भेट, फक्त 'इतक्या' रुपयांमध्ये बघता येणार 'गुडबाय'

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांची एक वेगळी अशी ओळख आहे. 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 ऑक्टोबर : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांची एक वेगळी अशी ओळख आहे. 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांना एक खास भेट मिळणार आहे. त्यामुळे चाहतेही त्यांच्या वाढदिवसासाठी मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत. नुकताच अमिताभ यांचा गुडबाय हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत बिग बींच्या वाढदिवसानिमित्त निर्माते प्रेक्षकांना एक खास भेट देणार आहेत. 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ‘गुडबाय’ चित्रपटाची तिकिटे देशभरात 80 रुपयांना विकण्याची तयारी सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण ही बातमी खरी ठरली तर त्याच्या चाहत्यांसाठी ही एक खास भेट ठरेल. हेही वाचा  -  लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला जुळ्यांना जन्म; चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बिग बींच्या वाढदिवशी चाहत्यांनी त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी यावे, अशी निर्मात्यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘गुडबाय’ चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, अमिताभ बच्चन ‘केबीसी’चे होस्ट बनून स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसले होते, मात्र आगामी एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी होस्टिंगची जबाबदारी स्वीकारताना दिसणार आहे. अमिताभ यांचा वाढदिवस केबीसीच्या मंचावर जबरदस्त साजरा करण्यात येणार आहे. यासाठी खास जया बच्चन आणि अभिषेक बच्चन उपस्थित राहणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात