मुंबई, 09 ऑक्टोबर : अभिनेत्री नयनताराच्या लग्नाची खूपच चर्चा झाली होती. साऊथच्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत तिने लग्नगाठ बांधली होती. आता त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. ते म्हणजे लग्नाच्या चार महिन्यांनंतरच अभिनेत्री नयनतारा आई झाली आहे. नयनताराला जुळी मुले झाली. अभिनेत्रीचा पती विघ्नेश शिवनने मुलांसोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. सिवनने स्वतःचे आणि पत्नी नयनताराचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ही बातमी ऐकून नयनताराच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. नयनतारा आणि विघ्नेश शिवन आपल्या दोन मुलांच्या लहान पायांचे चुंबन घेताना फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघे खूप आनंदी आहेत. फोटो शेअर करत विघ्नेश शिवनने लिहिले कि, ‘‘नयन आणि मी आज अम्मा आणि अप्पा झालो आहोत. आम्हाला जुळे मुलगे झाले आहेत. .. सर्वांच्या प्रार्थना, पूर्वजांच्या आशीर्वादाने आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रूपाने मिळाले आहे. आम्हाला तुमच्या सर्व प्रार्थनांची गरज आहे. आमची मुलं उईर आणि उलगम.’’ हेही वाचा - Har Har Mahadev : छोटा पडदा गाजवल्यानंतर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता आता साकारणार ऐतिहासिक भूमिका काही दिवसांपासून नयनतारा गरोदर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. हे जोडपे काही मुलांसोबत वेळ घालवताना दिसले होते. तेव्हा मुलांसोबतचे स्वतःचे आणि नयनताराचे फोटो शेअर करत विघ्नेश शिवनने लिहिले होते की, ‘तो भविष्यासाठी सराव करत आहे’. यानंतर अफवा सुरू झाल्या की हे जोडपे लवकरच बाळाला जन्म देण्याचा विचार करत आहेत. त्यानंतर नयनतारा गरोदर असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, आता या जोडप्याने सरोगसीच्या मदतीने आपल्या बाळांचे स्वागत केल्याचे दिसून येत आहे.
Nayan & Me have become Amma & Appa❤️
— VigneshShivan (@VigneshShivN) October 9, 2022
We are blessed with
twin baby Boys❤️❤️
All Our prayers,our ancestors’ blessings combined wit all the good manifestations made, have come 2gethr in the form Of 2 blessed babies for us❤️😇
Need all ur blessings for our
Uyir😇❤️& Ulagam😇❤️ pic.twitter.com/G3NWvVTwo9
यावर्षी ९ जून रोजी नयनतारा आणि विघ्नेश शिवनचे चेन्नईत लग्न झाले. चाहत्यांना ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी खूप आवडते. आज चाहतेही या दोघांच्या आनंदात सहभागी झाले आहेत. चाहत्यांनी दोघांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला. नयनतारा आणि विघ्नेशच्या लग्नाचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते.
नयनताराच्या लग्नाला सुपरस्टार शाहरुख खान, विजय सेतुपती आणि दिग्दर्शक अॅटलीही पोहोचले होते. प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर नयनतारा लवकरच शाहरुख खानसोबत दिसणार आहे. नयनतारा दिग्दर्शक अॅटली यांच्या जवान या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात विजय सेतुपती खलनायकाची भूमिका साकारणार असून थलपथी विजय कॅमिओ करणार आहे. जवान या चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच संपले आहे. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे.