मुंबई, 23 ऑगस्ट : आपल्या जीवनाचा काही भरवसा नसतो कधी कोण आपल्यामधून एक्झिट घेईल काही सांगता येत नाही. दरम्यानच्या काळात आपल्यामधून एका गायकाने अशीच अचानक एक्झिट घेतली. तेव्हा सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसला. हा गायक म्हणजे प्रसिद्ध गायक केके. केके अशा गायकांपैकी एक होते ज्यांनी आपल्या गायकीलाच आपला धर्म मानला. आणि आपल्या गायकीने रसिकांचं भरभरून प्रेम मिळवलं. तुम्ही जर ९० च्या दशकातील पॉप गाणी ऐकत असाल तर तुम्ही KK चे ‘यारों.. दोस्ती.. बडी ही हसीन है’ ऐकलेच असेल. या गाण्याने त्या काळातील तरुणांना अक्षरशः वेड लावले होते. केके तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले होते. केके अशा मोजक्या गायकांपैकी होते ज्यांनी गायकीसाठी अक्खा आयुष्य पणाला लावलं. त्यांचा शेवटही एक गाण्याची कॉन्सर्ट दरम्यान झाला. केकेच्या आयुष्याविषयी कोणाला जास्त कल्पना नाही. आज केकेच्या वाढदिवशी त्यांच्या जीवनाविषयी, कुटुंबियांबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. एका साध्या मल्याळी कुटुंबात जन्मलेल्या केकेने दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले आणि करिअरच्या सुरुवातीलाच लग्न केले. कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केकेला सुरुवातीला संघर्ष करावा लागला. त्याने टीव्हीतील जाहिरातींसाठी जिंगल्स गायले, ‘जस्ट मोहब्बत, शकलाका बूमबूम, हिपहिप हुर्रे’ सारख्या 90 च्या हिट टीव्ही शोसाठी गाणी गायली. यानंतर एआर रहमानने त्याला पार्श्वगायनाची संधी दिली. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील त्याचे ‘तडप तडप के इस दिल से’ हे गाणे इतके हिट झाले की त्या गाण्याचे आजही रसिकांच्या मनावर गरुड आहे. हेही वाचा - Abhidnya Bhave : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीपासून अभिज्ञाच्या संसाराला धोका; अभिज्ञाने केला खुलासा केकेला ‘फॅमिली मॅन’ म्हटले जायचे. केके यांनी कधीही त्यांचे वैयक्तिक आयुष्य मीडियासमोर उघड केले नाही. केकेने 1991 मध्येच त्याची गर्लफ्रेंड ज्योती कृष्णासोबत लग्न केले. केकेची प्रेमकहाणी इयत्ता 6 व्या वर्गात सुरू झाली. केके कॉमेडियन-होस्ट कपिल शर्माच्या शो ‘द कपिल शर्मा शो’ मधील गायक डॉ. पलाश सेन आणि शान यांच्यासोबत दिसला होता. या शोदरम्यान केकेने त्याच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला. त्याने सांगितले होते की, ज्योतीशी लग्न करण्यासाठी त्याला सेल्सची नोकरी करावी लागली, कारण सासरच्या मंडळींना आपल्या मुलीचे लग्न एका बेरोजगार मुलासोबत करायचे नव्हते. केकेने सांगितले की मी ते विक्रीचे काम तीन महिने केले आणि नंतर सोडून दिले. तसेच बायक आणि वडिलांच्या पाठिंब्याने केके गायक बनू शकले.
केकेने 1991 मध्ये त्याची प्रेमिका ज्योती कृष्णाशी लग्न केले. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांच्या मुलाचे नाव नकुल कृष्ण कुननाथ आणि मुलीचे नाव तमारा कुननाथ आहे. नकुल देखील केके सारखा प्रतिभावान आहे आणि त्याने 2008 मध्ये वडिलांच्या ‘हमसफर’ अल्बममध्ये ‘मस्ती’ गाणे गायले होते. जोपर्यंत तमाराचा संबंध आहे, ती एक प्रशिक्षित पियानो वादक आहे. मात्र, या दोघांच्या कारकिर्दीबाबत अधिकृत माहिती नाही.