मुंबई, 22 ऑगस्ट : मराठी मालिकाविश्वातील सध्याची आघाडीची खलनायिका म्हणजे अभिनेत्री अभिज्ञा भावे. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील पुष्पवल्ली म्हणून ती सध्या प्रेक्षकांची मन जिंकत आहे. अभिज्ञाची या मालिकेतील चुलबुली वल्लीची भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे. अभिज्ञा आणि तिच्या नवऱ्याचं नातं फार खास आणि छान आहे हे अनेकदा दिसून आलं आहे. या दोघांची गणती मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपलमध्ये होते. तिचा नवरा हा कॅन्सरशी लढा देत होता आणि आता तो लढा सफलरित्या पूर्ण झाल्याचं सुद्धा समोर येत आहे. अभिज्ञा सुद्धा नवऱ्याच्या कठीण काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. या दोघांनी मिळून या संकटावर मात केली. आता हे दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. नुकतीच या दोघांनी एका टीव्ही शो मध्ये हजेरी लावली होती. आता तिथे अभिज्ञानं आपल्या आवडत्या मैत्रीणीबद्दल एक खुलासा केला आहे. त्याची सर्वत्र चर्चा होतेय. नुकतंच अभिज्ञा व तिचा पती मेहुल पै या दोघांनी झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिथे अभिज्ञान आपल्या आवडत्या मैत्रीणीबद्दल एक खुलासा केला आहे. अभिज्ञाच्या सगळ्या आवडत्या मैत्रिणी म्हणजे अभिनेत्री अनुजा साठे, श्रेया बुगडे, रेश्मा शिंदे त्यांच्याबद्दल सगळ्यांना कल्पना आहेच. पण अभिंज्ञाने या शो मध्ये भलतीच आवडती मैत्रीण सांगितली. हि मैत्रीण म्हणजे चक्क बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस. अभिज्ञान जॅकलिनशी असलेल्या तिच्या मैत्रीचा किस्सा ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘चला हवा येऊ द्या’ चा निवेदक निलेश साबळे मेहुलला अभिज्ञाची आवडती मैत्रिण कोण? असा प्रश्न विचारतो. यावर मेहुल न बघता त्याच उत्तर अनुजा साठे असं देतो आणि ते उत्तर चुकलेले असतं. या प्रश्नाचं उत्तर जॅकलिन फर्नांडिस असं असतं. यावर मेहुलला देखील धक्का बसतो आणि तो दोन वेळा मागे वळून बघतो. हेही वाचा - Laal singh chaddha : बॉक्स ऑफिसवरच्या निराशाजनक कामगिरीनंतर आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला अजून एक धक्का इतक्यात अभिज्ञा यावर त्यांच्या लग्नानंतरचा एक किस्सा सांगत याचा खुलासा करते. या व्हिडीओत अभिज्ञा म्हणते, “मी लग्नानंतर मेहुलला विचारलं होतं की बायको म्हणून मला कोणत्या व्यक्तीकडून धोका असेल? त्यावर त्याने मला जॅकलिन फर्नांडिस म्हटलं होतं. त्यामुळे मी तिला मैत्रीण बनवली, मग ती आता माझी सवत होणार नाही.” अभिज्ञाचं हे उत्तर ऐकून उपस्थित सर्वांनाच हशा फुटतो. सगळेच जण जोरजोरात हसायला लागतात, पण मेहुलचा चेहरा मात्र फारच केविलवाणं होतो. पण अभिज्ञा आणि तिच्या नवऱ्याची केमिस्ट्री आणि बॉण्डिंग प्रेक्षकांना फारच आवडतं. या दोघांचे मजेशीर रिल्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता या दोघांची ही गोष्ट ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.