मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बॉलिवूडचे मराठमोळे कला दिग्दर्शक मारुतीराव काळे काळाच्या पडद्याआड; कोरोनाने घेतला बळी

बॉलिवूडचे मराठमोळे कला दिग्दर्शक मारुतीराव काळे काळाच्या पडद्याआड; कोरोनाने घेतला बळी

'सौदागर', 'दीवार' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं होतं.

'सौदागर', 'दीवार' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं होतं.

'सौदागर', 'दीवार' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं होतं.

मुंबई 1 जून : बॉलिवूड मधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक मारुतीराव काळे (Marutirao V. Kale) यांच कोरोनाने निधन झालं आहे. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांचं कला दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. ‘सौदागर’ (Saudagar), ‘डिस्को डान्सर’ (Disco Dancer) अशा हिट चित्रपटांचाही त्यात समावेश आहे. कोरोना संक्रमन झाल्याने मुंबईतील एका रुग्णालयात त्यांना भर्ती करण्यात आलं होतं. पण अखेर त्यांची झुंज अशस्वी ठरली. ते 92 वर्षांचे होते.

मारुतीराव काळे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील 100 हून अधिक चित्रपटांचे सेट तयार केले होते. ते एक प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर होते. 1960 साली आलेल्या ‘मुघल-ए-आजम’ (Mughal-E-Azam) या चित्रपटासाठी देखील त्यांनी काम केलं होतं. मारुतीराव काळे यांची मुलगी कल्पना काळे यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. (Art director Marutirao Kale died due to corona)

बॉलिवूड भाईजानसोबत पंगा घेणं आलं अंगाशी? KRK ने ट्विटर केलं लॉक

मुंबईतील बांद्रा येथील होली फॅमिली रुग्णालायात त्यांनी भरती करण्यात आलं होतं. 7 मे ला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण सातत्याने त्यांची तब्येत खालावत होती. उतार वय असल्याने ते कोरोनावर मात करू शकले नाही.   27 मे च्या दिवशी  त्यांचं निधन झालं.

देवमाणूस: शक्कल लढवून डिम्पल थांबवणार का देवी सिंगची अटक?

मारुतीराव यांनी   'इमान धरम', 'डिस्को डान्सर', 'कसम पैदा करनेवाले की', 'डान्स डान्स', 'कमांडो', 'अजूबा', 'सौदागर' यांसारख्या सुपरहीट चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं होतं. उत्कृष्ट असे सेट्स त्यांनी डिझाईन केले होते. त्याआधी त्यांनी असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून फिल्म 'रोटी कपड़ा और मकान', 'दीवार','रझिया सुल्तान', 'पाकिजा, 'शोर',  'कभी कभी' 'दो अंजाने', 'मेरा साया', 'यादगार', 'जांबांज' अशा चित्रपटांसाठी काम केलं आहे. त्यांच काम हे बॉलिवूडसाठी कायमच अविस्मरणीय ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Coronavirus, Entertainment, Mumbai