जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / देवमाणूस: शक्कल लढवून डिम्पल थांबवणार का देवी सिंगची अटक?

देवमाणूस: शक्कल लढवून डिम्पल थांबवणार का देवी सिंगची अटक?

देवमाणूस: शक्कल लढवून डिम्पल थांबवणार का देवी सिंगची अटक?

डिम्पल म्हणतेय तिलाच काहीतरी शक्कल लढवावी लागेल, त्यामुळे देवी सिंग पुन्हा सुटणार का?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 1 जून: झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय तसेच बहुचर्चित मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. गुन्हेगाराचा छडा आता पोलिसांना लागला आहे. ते आता देवी सिंगच्या अटकेसाठीही आले आहेत. दुसरीकडे मात्र डिम्पल (Dimple) आणि डॉक्टर अर्थात देवी सिंगचं (Devi Singh) लग्न होत आहे. डॉक्टरने डिम्पलला त्याने केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ते दोघेही आता लग्न करून लवकरात लवकर कातळवाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान मागील भागांत आपण पाहिलत डॉक्टरला पोलिसांचा प्लॅन समजला होता. त्यामुळे त्याने दिव्याला गुंगारा देत तिथून पळ काढला. त्यानंतर लग्नघरातून कोणचही लक्ष नसताना दिव्याच्या घरी जाऊन तिचा खून केला.

आमिर खानची लेक पुन्हा झाली रोमँटिक, आयराने बॉयफ्रेंडसाठी शेयर केला खास VIDEO

आता डॉक्टर आणि डिम्पलचं लग्न होतं आहे. पण लवकरत लवकर तो हे गाव सोडण्याचा विचार करत आहे. त्यासाठी दोघेही लग्न उरकल्यानंतरच हनिमूनच्या नावाखाली तिथून पळ काढणार आहेत. मात्र याआधीच भर लग्नात दिव्या तिथे पोहोचली आहे. त्यामुळे डॉक्टरचा दिव्याला मारण्याचा प्लॅन फसला असल्याचं समोर येत आहे. तर तिने डॉक्टरला चांगला चोपही दिला आहे.

जाहिरात

दरम्यान दिव्याचं हे रुप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. डॉक्टरला केलेल्या या मारहाणीमुळे गावातील लोकांना मोठा धक्का ही बसला आहे. तेव्हा आता दिव्या खरच डॉक्टरला अटक करू शकणार का असा प्रश्न होत आहे. याशिवाय अनेकदा डिम्पलने डॉक्टरची साथ दिली आहे. व त्याला पोलिसांच्या तावडीतून सोडवलं आहे. त्यामुळे यावेळीही डिम्पल काही शक्कल लढवणार तर नाही ना हे पाहण औत्सुक्याचं ठरेल. देवी सिंगचं खरं रुप समोर आल्यानंतर मालिका संपणार असं प्रेक्षकांना वाटलं होतं. मात्र आता पुढे सुरुच राहणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता मालिका काय वळण घेणार पाहंण रंजक ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात