मुंबई 1 जून : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी तसेच ट्विट्ससाठी चर्चेत राहणारा अभिनेता तसेच स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमाल राशिद खान (Kamal R. Khan) म्हणजे KRK पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. सलमान खानवरील (Salman Khan) टीका त्याला महागात पडलेली दिसत आहे. सलमानच्या टीमने काही दिवसांपूर्वी लिगल नोटीस त्याला पाठवली होती. तर आता KRKने त्याचं ट्वीटर अकाउंट प्रायव्हेट केलं आहे. (KRK locks his twitter account)
काही दिवसांपूर्वी KRKने सलमानचा बहूचर्चित चित्रपट ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) वर समिक्षा करत चांगलीच टीका केली होती. याच्या काही दिवसांनंतर KRKला नोटीस मिळाली तर ही नोटीस आपण केलेल्या समिक्षेमुळेच आली असल्याचं KRK ने ट्वीट करत सांगितलं. पण सलमानच्या वकिलांनी याचा खुलासा करत ही नोटीस वेगळ्या कारणासाठी असल्याचं म्हटलं. ‘गेले काही महिने कमाल खान सतत सलमान खान , सलमान खान फिल्म्स (SKF) तसेच सलमानचा ब्रँड बीइंग ह्युमन यांची बदनामी करत आहे. तसेच सलमानला गुंड म्हणून संबोधत आहे. पैसे दाबल्याचे खोटे आरोप करत आहे.’ यामुळे ही नोटीस पाठवली असल्याचा खुलासा त्यांनी केला.
या सगळ्या प्रकारानंतर KRKने अनेक ट्विट्स केले होते. मात्र आपण सुनावणीनंतर उत्तर देणार असल्याचंही म्हटलं होतं. पण आता त्याने त्याचं शस्त्र असलेलं ट्विटर अकाउंट लॉक केलं आहे. त्यामुळे आता केवळ KRK चे फॉलेवर्सच त्याचे ट्वीट पाहू शकणार आहे.
‘अलका कुबल बनून राहिलीस तर...’; भलताच सल्ला देणाऱ्या ट्रोलरला जुईचं सडेतोड उत्तर
दरम्यान या सगळ्या वादविवादात गायक मिका सिंगने (Mika Singh) सलमान खानची बाजू घेतली होती. व एका युझरला पंजाबीतून रिप्लाय केला होता. त्यात त्याने KRKला अनब्लॉक करायला सांगितलं होतं. व आपण त्याचा डॅडी असल्याचही म्हटल होतं. त्यामुळे आता कमाल खान त्याचं अकाउंट कायम लॉक ठेवणार की अनलॉक करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Salman khan