मुंबई, 21 फेब्रुवारी- The Family Man 3 : दिग्दर्शक राज निदिमोरु आणि कृष्णा डी.के. यांच्या‘द फॅमिली मॅन’**(The Family Man)**च्या पहिल्या सिझनप्रमाणे ‘फॅमिली मॅन 2’ देखील (Family Man 2) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या दोन्ही सिझनच्या जबरदस्त यशानंतर द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सिझनसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आता लवकरच मनोज वाजपेयीचा **(Manoj Vajpayee )**तिसरा सीझन प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करण्यासाठी सज्ज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार दुसऱ्या सिझनचा ज्याप्रकारे शेवट झाला होता त्यावरून प्रेक्षकांनी तिसऱ्या सिझनचा अंदाज बांधला होता. राज आणि कृष्णा पहिल्यापासून स्क्रिप्टवर काम करत होते. रिपोर्टनुसार, अद्यापही या कथेवर काम करायचे आहे असा विचार घेऊन ‘द फॅमिली मॅन’ चे निर्माते समोर आले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार या वर्षा अखेर हा सीझन पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. वाचा- PHOTOS: अमृता खानविलकरच्या कलरफुल लुकवर हाऊसफुल कमेंट! तिसऱ्या सिझनमध्ये मनोज वाजपेयी, प्रियामणी आणि काही साहाय्यक कलाकार देखील दिसू शकतात स्किप्ट पूर्ण झाल्यानंतर कास्टिंग प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे कलाकारांच्या नावाबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. यापूर्वीच्या सिझनमध्ये शारिब हाशमी, प्रियामणी, समांथा रूथ प्रभू आणि श्रेया धनवंतरीसह अन्य कलाकार दिसले होते. वाचा- लाल साडी, चेहऱ्यावरचा ग्लो अन् असा होता काजल अग्रवालचा बेबी ‘शॉवर’ लुक ‘द फॅमिली मॅन’च्या पहिल्या सिझनमध्ये दिल्ली आणि जम्मू काश्मीर स्थितीवर भाष्य करण्यात आले होते. तर ‘फॅमिली मॅन 2’ मध्ये तमिळमधील नक्षलवाद्यांशी लढा देताना दाखवण्यात आले होते. सिरिजमधील अनेक भागही सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला होता. मात्र दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा अक्खीनेनीला सुसाईड बॉम्बर दाखविण्यात आल्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती. आता उत्सुकता फक्त तिसऱ्या सिझनची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.