Home /News /entertainment /

Kajal Aggarwal Baby Shower: लाल साडी, चेहऱ्यावरचा ग्लो अन् असा ओसंडत होता चेहऱ्यावर आई होणार असल्याचा आनंद

Kajal Aggarwal Baby Shower: लाल साडी, चेहऱ्यावरचा ग्लो अन् असा ओसंडत होता चेहऱ्यावर आई होणार असल्याचा आनंद

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal)चं 'नुकतंच बेबी शॉवर' (Kajal Aggarwal Baby Shower) पार पडलं. तिनं आपल्या इन्स्टा स्टोरीच्या (Instagram Story) माध्यमातून बेबी शॉवरचे काही फोटो शेअर केले आहेत.

    Kajal Aggarwal Baby Shower: लाल साडी, चेहऱ्यावरचा ग्लो अन् असा ओसंडत होता चेहऱ्यावर आई होणार असल्याचा आनंदमुंबई, 21 फेब्रुवारी-   अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ही दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी एक प्रसिद्ध चेहरा आहे. साऊथ इंडस्ट्रीव्यतिरिक्त तिनं बॉलिवूडमध्येही (Bollywood) काही चित्रपट केले आहेत. अजय देवगणच्या 'सिंघम' (Singham) या हिट चित्रपटाद्वारे तिनं बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं होतं. करिअर शिखरावर असताना तिनं 30 ऑक्टोबर 2020 रोजी उद्योगपती गौतम किचलूशी (Gautam Kitchlu) लग्न केलं होतं. आता लवकरच त्यांच्या घरात एका छोट्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे. काही महिन्यांपूर्वी काजल अग्रवालनं तिच्या गरोदरपणाची (Pregnancy) बातमी सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांसोबत शेअर केली होती. सध्या काजल आपल्या  प्रेग्नेंसीचा आनंद घेत असून नुकतंच तिचं 'बेबी शॉवर'  (Kajal Aggarwal Baby Shower) पार पडलं. तिनं आपल्या इन्स्टा स्टोरीच्या (Instagram Story) माध्यमातून बेबी शॉवरचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. होणारे आई-बाबा म्हणजे काजल आणि गौतम खूपच आनंदी असल्याचं या फोटोंमधून दिसत आहे. नुकताच काजलचा 'बेबी शॉवर' सोहळा झाला. बेबी शॉवरमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यात काजलला टॅग (Tag) केलं आहे. काजलनं हेच फोटो आपल्या इन्स्टा स्टोरीवर रिपोस्ट (Repost) केले आहे. काजलच्या घरी छोट्या पाहुण्याच्या आगमनाची किती आतुरता आहे, हे बेबी शॉवरचे फोटो पाहून लक्षात येतं. या कार्यक्रमासाठी तिनं लाल रंगाची (Red Color) साडी नेसली होती. डोक्यावर पदर घेतलेल्या काजलच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा  ग्लो (Pregnancy Glow) दिसत आहे.
    आयुष्यातील या स्पेशल दिवशी पती गौतम किचलूसुद्धा काजलच्या सोबत होता. दोघांनी मिळून बेबी शॉवरचे विधी पूर्ण केले. या कार्यक्रमासाठी कुटुंबातील सदस्य, काही जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर काजल आणि गौतम यांनी भरपूरफोटो क्लिक केले आहेत. यावेळी त्यांच्या मित्र परिवाराने देखील होणाऱ्या आई-बाबांसोबत फोटो क्लिक करण्याचा आनंद लुटला. वाचा-'हरली पण पुरस्कार देऊन गेली..', सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत काजल अग्रवाल आणि गौतम किचलू  30 ऑक्टोबर 2020 रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्नबंधनात अडकले होते. या वर्षाच्या (2022) सुरुवातीला गौतमनं काही फोटो शेअर करत काजल प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं होतं. सध्या ती मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच तिच्या 'हे सिनामिका' (Hey Sinamika) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात ती दुलकर सलमान (Dulquer Salmaan) आणि आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Pregnancy, Tollywood

    पुढील बातम्या