मराठीसह हिंदीत अभिनयाचा डंका वाजविणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडिया प्रचंड सक्रिय असते. फोटो असतील किंवा डान्स व्हिडिओ यामुळे ती चर्चेत असते.
अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar ) लवकरच ‘पाँडीचेरी’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यस्त आहे.
या कलरफुल शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहे. यावर चाहत्यांकडुन हाऊसफुल अशा कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
या सिनेमात सई, वैभव आणि अमृता यांच्या नात्याचा नवीन प्रवास आपल्यासमोर उलगडणार आहे. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आला आहे.
या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आला आहे.
‘पाँडीचेरी’ चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यासाठी या सिनेमाटी स्टारकास्ट प्रोमोशनात व्यस्त आहे.