मुंबई, 2 जुलै- अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. सई अलीकडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. दिवसातून ती किमान एक तरी पोस्ट आपल्या चाहत्यांसाठी शेयर करत असते. आणि चाहतेही तिला भरभरून दाद देत असतात. नुकताच सईने एक व्हिडीओ शेयर (Share Video) केला आहे. यामध्ये ती अस्सल मराठी मुलगी दिसून येत आहे. इतकचं नव्हे तर यामध्ये तिने कोल्हापुरी तडकादेखील लावला आहे.
मराठीतील एक सुंदर अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखलं जातं. सईने बिग बॉस मराठीमध्येसुद्धा सहभाग घेतला होता. बिग बॉस मराठीमुळेसुद्धा सईला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सई विविध व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. सध्या सई सोशल मीडियावरून चाहत्यांचं मनोरंजन करत असते. सईने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये सईने वेस्टर्न लुकवर मराठमोळा तडका लावला आहे. सईने जीन्स आणि कुर्तीवर अस्सल मराठमोळी नथ आणि टिकली लावून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचंबरोबर सईने ऑक्साईडचे दागिने आणि विशेष म्हणजे डोक्यावर पारंपरिक टोपी देखील घातली आहे. यासर्व गेटअप सह सई ‘इथून धक्का तिथून धक्का’ गाण्यावर लिप्सिंग करत असल्याचं दिसत आहे. (हे वाचा: कलेचं माहेरघर संकटात; जयप्रभा-शालिनी स्टुडीओच्या बचावासाठी आंदोलन ) सईचा हा अंदाज चाहत्यांना खुपचं अनोखा वाटत आहे. चाहते सईच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स करून आपली पसंती दर्शवत आहेत. सई असे अनेक व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर करत असते. काही दिवसांपूर्वीच मराठमोळ्या सईने चक्क साउथ इंडियन तडका लावला होता. तिचा तो व्हिडीओदेखील खुपचं व्हायरल झाला होता. (हे वाचा: अखेर डिम्पल अडकली पोलिसांच्या जाळ्यात; देवी सिंग विरोधात देणार साक्ष? ) अभिनेत्री सई लोकूरने ‘मिशन चॅम्पियन’ या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. सई बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. आणि यामध्ये तिनं प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली होती. म्हणूनचं ती या घरात तब्बल 100 दिवस टिकून होती.