मुंबई,2 सप्टेंबर- ज्येष्ठ दिवंगत अभिनेते दिलीप कुमार**(Dilip Kumar)** यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) गेली चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. श्वास घेण्यास अडचण आणि छातीत दुखणे या कारणांसाठी त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या त्यांच्या तब्ब्येतीत सुधार (Health) होतं आहे. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समजताच चाहते चिंतीत झाले होते. तसेच त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. तसेच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ताब्ब्येतीत सुधार होत आहे. सायरा बानो यांच्यावर डॉक्टर नितीन गोखले हे उपचार करत आहेत. त्यांनी अभिनेत्रींबद्दल अपडेट दिली आहे. ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सायरा बानो यांचा लेफ्ट वेंट्रिकुलर निकामी झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार आहे.त्यानंतर परत उपचार सुरु राहणार आहे. तसेच सांगण्यात आलं आहे की सायरा बानो यांच्या ताब्ब्येतीत चांगला सुधार होत आहे. त्यामुळे त्यांना लवकरच ICU मधून बाहेर काढून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांना थोडा धीर मिळाला आहे. (**हे वाचा:** अर्चना-मानवच्या ‘पवित्र रिश्ता’चा ट्रेलर रिलीज; सुशांतचे चाहते झाले इमोशनल ) डॉ.नितीन गोखले यांच्या मते, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार त्यांनतर योग्यवेळी त्यांना शत्रक्रियेसाठी परत बोलवण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना आधी डायबिटीज कन्ट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि पती दिलीप कुमार यांचं दोन महिन्यांपूर्वीच निधन झालं आहे. निधनानंतर त्या एकट्या झाल्या आहेत. त्यांनी आयुष्यभर दिलीप कुमारांची सेवा केली आहे त्यांना साथ दिली आहे. त्यांच्या निधनानंतर त्या कोसळून गेल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.