• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अर्चना-मानवच्या Pavitra Rishta चा Trailer रिलीज; सुशांतचे चाहते झाले इमोशनल

अर्चना-मानवच्या Pavitra Rishta चा Trailer रिलीज; सुशांतचे चाहते झाले इमोशनल

Pavitra Rishta Trailer : अर्चना-मानवचा पवित्र रिश्ता (Pavitra Rishta) पुन्हा एका नव्या रूपात.

 • Share this:
  मुंबई, 01 सप्टेंबर : काही प्रेमकथा या अमर असतात आणि अशाच अमर प्रेमकथांपैकी एक म्हणजे मानव-अर्चनाचा 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta). अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि  अंकिता लोखंडे (Ankita lokhande) यांची सुपरहिट सीरिअल पवित्र रिश्ता पुन्हा एका नव्या रूपात आपल्या भेटीला येते आहे. पवित्र रिश्ता 2.0 (Pavitra Rishta 2.0) म्हणजे पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज (Pavitra Rishta trailer) झाला आहे. ‘पवित्र रिश्ता.. इट्स नेवर टू लेट’ (Pavitra Rishta…Its Never too late) मध्ये पुन्हा एका अर्चना-मानवची लव्हस्टोरी रंगणार आहे. अर्चनाच्या भूमिकेत अंकिता लोखंडेच आहे. पण सुशांतच्या जागी आता मानव म्हणून शाहीर शेख (Shaheer Sheikh) दिसणार आहे. यानिमित्ताने आता सुशांतच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. चाहत्यांना सुशांतची उणीव भासते आहे.
  झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये मानव आणि अर्चनाचं लग्न कुटुंबाच्या मर्जीने होतं. म्हणजे दोघांचंही कुटुंब हे लग्न जुळवून देतं. दोघांचं लग्नही होतं. पण काही कारणामुळे लग्नमंडपातूनच त्यांना वेगळं व्हावं लागतं आणि त्यानंतर दोघं आपलं कुटुंब आणि नात्यासाठी काय करतात? आपलं नातं की कुटुंब कुणाला निवडतात? यावर आधारित ही मालिका आहे. हे वाचा - KBC13 मध्ये हिमानी बुंदेलाला 7 कोटींसाठी विचारण्यात आला होता हा प्रश्न नव्या पवित्र रिश्तावरून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी सुशांत नसल्याने या सीरिअलवरून नाराजी दर्शवली आहे. सुशांतची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही असं म्हटलं आहे. तर काही जणांना मात्र या मालिकेची प्रतीक्षा आहे.
  Published by:Priya Lad
  First published: