मुंबई, 5 ऑगस्ट- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि अभिनेत्री अमृता फडणवीस(Amruta Fadanvis) नेहमीचं चर्चेत असतात. आत्ता पुन्हा एकदा त्या एका खास कारणाने चर्चेत आल्या आहेत. नुकताच अमृता फडणवीस यांनी आपलं नवं गाणं(New Song) येत असल्याची घोषणा केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात अक्षरशः थैमान घातलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवल्या होत्या. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्येसुद्धा कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र सध्या कोरोनाचं प्रमाण कमी होतं आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं आहे. जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांची संख्या पाहून त्या त्या जिल्ह्यांसाठी योग्य तो निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये 11 जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा आदेश सरकारने दिला आहे. या यादीत पुणे शहर आणि जिल्ह्याचाही समावेश आहे. (हे वाचा: श्रेयाने बहिणीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; शेयर केले बालपणीचे खास PHOTO ) त्यामुळे पुण्यातील नागरिकांत नाराजीचं वातावरण आहे. मुंबईला सूट आणि पुण्यात का निर्बंध असा उलट सवालही पुणेकर करत आहेत. याचं मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांनी पुणेकरांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पुणेकरांना सरकारच्या या निर्णयाविरुद्ध धरणे आंदोलन करण्याचा सल्लासुद्धा दिला आहे. तसेच येत्या गणेशोत्सवाच्या आधी आपलं नवीन गाणं येत असल्याचंही जाहीर केलं आहे. (हे वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; उर्मिला बनली आई! ) पुण्याच्या धागा हॅन्डलूम महोत्सवात अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. त्यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपस्थित पुणेकरांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘कोरोना काळातील सर्व नियमांचं पालन करून सर्वांनी शॉपिंग करा. मुंबईसह इतर ठिकाणी नियम काही प्रमाणत शिथिल झाले आहेत. मात्र पुण्यातचं का नाही? पुण्यामध्ये रुग्णसंख्या फक्त 4 टक्के असतानाही नियम शिथिल का झाले नाहीत?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. पुढे बोलताना त्यांनी आपल्या एका गाण्याची घोषणादेखील केली. लवकरच येणाऱ्या गणेशोत्सवाच्या आधी आपलं हे नवं गाणं, येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

)







