मुंबई, 5 ऑगस्ट- आपल्या विनोदाने हसवून लोटपोट करणारी कॉमेडी क्वीन म्हणजे श्रेया बुगडे (Shreya Bugade) होय. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) च्या माध्यमातून श्रेया घराघरात पोहोचली आहे. श्रेयाचं आपल्या बहिणीशी खुपचं खास नातं आहे. ती सतत आपल्या बहिणीसोबतचे खास फोटो शेयर करत असते. त्यांच्यातील प्रेम हे सर्वांनाचं माहिती आहे. तर आज श्रेयाच्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने श्रेयाने लहानपणीच्या फोटोंसहित एक खास व्हिडीओ शेयर(Share Video) करत बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
‘चला हवा येऊ द्या’ मधून श्रेयाने सर्वांच्या मनावर गारुड घातलं आहे. सर्व पुरुष मंडळी असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये ती एकमेव महिला कलाकार होती. मात्र ती यासर्व कलाकरांना बरोबरीने टक्कर देत होती. आपल्या कॉमेडी टायमिंगने श्रेयाने चाहत्यांना आपलं वेड लावलं आहे. श्रेयाला या कार्यक्रमामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. श्रेया सतत आपल्या मैत्रीणींसोबत वेळ घालवताना दिसून येते. अशीच एक तिची मैत्रीण जी लहानपणापासून तिच्या सोबत वाढलीय, ती म्हणजे तिची मोठी बहीण तेजस होय.
(हे वाचा:मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; उर्मिला बनली आई!)
या दोघी बहिणींमध्ये मैत्रीनींसारखं नातं आहे. त्यामुळे त्या सतत सोबत दिसून येतात. तसेच सतत एकमेकांसोबतचे खास फोटोसुद्धा शेयर करत असतात. आज श्रेयाच्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने श्रेयाने एक सुंदर व्हिडीओ शेयर करत आपल्या दीदीला शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओमध्ये श्रेया आणि तिच्या बहिणीच्या बालपणाच्या फोटोंचासुद्धा समावेश आहे. श्रेयाने हा व्हिडीओ शेयर करत आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
(हे वाचा:सोनाली-कुणालची मालदीवमध्ये स्पेशल डेट; फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव )
आणि महत्वाचं म्हणजे श्रेया आणि तिची बहीण तेजस दिसायला जवळजवळ अगदी एकसारख्याच आहेत. या दोघींमध्ये खुपचं साम्य आहे. या दोन्ही बहिणींचं प्रेम चाहत्यांनासुद्धा खुपचं भावतं. चाहत्यांनासोबतचं इतर कलाकार मित्रसुद्धा श्रेयाच्या या पोस्टवरून तिच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.