जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; उर्मिला बनली आई!

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; उर्मिला बनली आई!

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; उर्मिला बनली आई!

मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरने काही महिन्यांपूर्वी आपल्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 ऑगस्ट- मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने (Urmila Nimbalakar) आज एक अत्यंत गोड बातमी दिली आहे. उर्मिलाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. उर्मिलाने एका गोंडस मुलाला जन्म (Blessed with Baby Boy) दिला आहे. उर्मिलाने स्वतः पोस्ट करत ही गोड बातमी सर्वांना दिली आहे. ही बातमी समजताच उर्मिलावर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने सुद्धा कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरने काही महिन्यांपूर्वी आपल्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती. त्यांनतर तिने आपल्या बेबी बंपचा फोटो शेयर केला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. उर्मिलाने आपली प्रेग्नेन्सी खुपचं एन्जॉय केली आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिने आपल्या प्रेग्नेन्सीच्या नऊ महिन्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. ती सतत आपल्या बेबी बंपसह आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत होती. (हे वाचा: सोनाली-कुणालची मालदीवमध्ये स्पेशल डेट; फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव   ) उर्मिलाचं स्वतः चं यूट्यूब चेनेलदेखील आहे. त्यावर ती विविध टिप्स आणि स्टाईल संबंधी गोष्टी शेयर करत असते. प्रेग्नेसीच्या नऊ महिन्यामध्येसुद्धा तिने आपले विविध टिप्स देणारे व्हिडीओ शेयर केले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच उर्मिला आपल्या बेबी बंपच्या फोटोंवरून सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. त्यावर तिने सडेतोड उत्तरदेखील दिलं होतं. (हे वाचा: VIDEO: मालदीवमधून सोनालीचं LIVE सेशन; पतीला दिलं खास सरप्राइज ) नुकताच उर्मिलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये तिने आपण मुलाला जन्म दिल्याचं सांगितलं आहे. उर्मिलाने 3 ऑगस्टला आपल्या मुलाला जन्म दिला आहे. उर्मिलाने ही पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे. तर अनेक कलाकारांनी उर्मिलाला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीनेसुद्धा कमेंट करत उर्मिलाचं अभिनंदन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात