मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'त्या' NUDE सीनपूर्वी राधिका आपटेशी अशी झाली होती चर्चा, आदिल हुसैनचा मोठा खुलासा

'त्या' NUDE सीनपूर्वी राधिका आपटेशी अशी झाली होती चर्चा, आदिल हुसैनचा मोठा खुलासा

‘पार्च्ड’ या चित्रपटात अभिनेता आदिल हुसैन आणि अभिनेत्री राधिका आपटेने एकत्र काम केल होतं. यावेळी कथानकाची गरज म्हणून दोघांनाही न्यूड सीन द्यावे लागले होते.

‘पार्च्ड’ या चित्रपटात अभिनेता आदिल हुसैन आणि अभिनेत्री राधिका आपटेने एकत्र काम केल होतं. यावेळी कथानकाची गरज म्हणून दोघांनाही न्यूड सीन द्यावे लागले होते.

‘पार्च्ड’ या चित्रपटात अभिनेता आदिल हुसैन आणि अभिनेत्री राधिका आपटेने एकत्र काम केल होतं. यावेळी कथानकाची गरज म्हणून दोघांनाही न्यूड सीन द्यावे लागले होते.

मुंबई, 1 जून- अभिनेत्री राधिका आपटे(Radhika Apte) आपल्या अभिनयासोबतचं आपल्या बोल्डनेसमुळे सुद्धा चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच राधिकाचा न्यूड व्हिडीओ (Nude Video)  सोशल मीडियावर लिक झाला होता. त्यामुळे राधिकाला मोठा धक्का बसला होता. यावर तिने आपलं मत देखील व्यक्त केल होतं. राधिकाने ज्या अभिनेत्यासोबत हे न्यूड सीन दिले होते, तो अभिनेता म्हणजे आदिल हुसैन (Adil Husain) होय. नुकताच आदिलने सुद्धा यावर मौन सोडत आपलं मत व्यक्त केल आहे.

‘पार्च्ड’ या चित्रपटात अभिनेता आदिल हुसैन आणि अभिनेत्री राधिका आपटेने एकत्र काम केल होतं. यावेळी कथानकाची गरज म्हणून दोघांनाही न्यूड सीन द्यावे लागले होते. राधिकासाठी हे खुपचं कठीण होतं असं तिने म्हटलं आहे. कारण ती त्यावेळी आपल्या बॉडी इमेजला घेऊन त्रस्त होती. आणि अशातच राधिकाने हे सीन दिले होते. मात्र या चित्रपटातील हे न्यूड सीन सोशल मीडियावर लिक झाले होते. इतकच नव्हे तर पॉर्न साईडवर सुद्धा हा व्हिडीओ लिक झाला होता. त्यामुळे राधिका नैराश्यात गेली होती. आणि नंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला धीर देत सावरलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Adil Hussain (@_adilhussain)

आत्ता या न्यूड सीनबद्दल अभिनेता आदिल हुसैनने आपलं मौन सोडलं आहे. आदिलने या सीनचा आपला अनुभव सांगितला आहे. तसेच या सीनपूर्वी आदिल आणि राधिका यांच्यामध्ये काय संवाद झाला होता, यावर सुद्धा त्यांनी खुलासा केला आहे.

(हे वाचा: आमिर खानची लेक पुन्हा झाली रोमँटिक, आयराने बॉयफ्रेंडसाठी शेयर केला खास VIDEO )

आदिलने ई टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. आदिलला विचारण्यात आलं होतं की या सीनबद्दल त्याच्या पत्नीची काय प्रतिक्रिया होती. यावर बोलताना आदिलने म्हटलं आहे, ‘ती पाहिली व्यक्ती होती, जिला मी या न्यूड सीनबद्दल सांगितल होतं, आणि तिने मला यात सहकार्यचं केल होतं. कारण तिला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि एका कलाकारासाठी प्रत्येक सीन तितकाच महत्वाचा असतो हेही तिला माहिती आहे.

(हे वाचा:तब्बल 20 वर्षांनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र, जबरदस्त डान्स VIDEO होतोय VIRAL  )

तसेच ‘पार्च्ड’ मध्ये न्यूड सीन देण्यापूर्वी राधिकाशी काय संवाद झाला होता. याबद्दल सांगताना त्यांनी म्हटलं आहे, ‘मी राधिकाला फक्त एक गोष्ट विचारली होती. आपल्या या सीनवर तुझ्या बॉयफ्रेंडची काय प्रतिक्रिया आहे. त्यावर राधिकाने मला म्हटलं होतं, की माझं लग्न झालेलं आहे.

राधिका एक उत्तम अभिनेत्री आहे, आणि ती प्रत्येक भूमिका तितक्याच ताकतीने निभावत असल्याचं देखील त्यांनी म्हटल आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment