मुंबई, 1 जून- असं म्हटलं जात प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतीच वेळ नसते. त्यामुळेच अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान सतत आपल्या बॉयफ्रेंडवर आपलं प्रेम व्यक्त करत असते. सोशल मीडियावर या दोघांच्या प्रेमाची मोठी चर्चा सुरु असते. नुकताच आयराने पुन्हा एकदा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेवर (Nupur Shikhare) आपलं प्रेम व्यक्त करत एक व्हिडीओ पोस्ट (instagram Video) करत, जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आयरा खान सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. तिने आपल्या आणि नुपूर शिखरेच्या नात्याला कधीच लपवल नाही. ती सतत आपले खाजगी फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. आणि आपलं नुपूरबद्दल प्रेम बिनधास्तपणे व्यक्त करत असते.
View this post on Instagram
नुकताच आयराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये आयाराने नुपूर सोबत घालवलेल्या खास क्षणांना शेयर केलं आहे. तिने नुपूरसोबतच्या त्या खास क्षणानां उजाळा दिला आहे. इतकच नव्हे तर व्हिडीओ शेयर करत नुपूरला आपल्या मनातली गोष्ट देखील सांगितली आहे.
(हे वाचा: तब्बल 20 वर्षांनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र, जबरदस्त डान्स VIDEO होतोय VIRAL )
आयराने आपल्या आणि नुपूरच्या खास फोटोंना एकत्र करून हा सुंदर व्हिडीओ बनवला आहे. आणि त्याला कॅप्शन देत म्हटल आहे, ’तू माझा एंकर आहेस, खूपच वेडेपणा जाणवत आहे. मात्र मी तुझ्यावर खरचं खूप प्रेम करते’. असं आयराने म्हटलं आहे. तर त्याला उत्तर देत नुपूरने सुद्धा म्हटलं आहे, ‘माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे’.
(हे वाचा:HBD: राज कपूर यांच्यासाठी विकले होते दागिने, वाचा नर्गिस यांचा तो किस्सा )
या दोघांचं प्रेम पाहून चाहतेदेखील खुश झाले आहेत. आणि कमेंट करून या दोघांचं कौतुक करत आहेत. आणि यांच्या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. यावर अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने सुद्धा हार्ट इमोजीशेयर करत या व्हिडीओवर प्रेम व्यक्त केल आहे.
यावर्षी व्हेलेंटाईन डेला या आयराने आपलं नात सर्वांसमोर मान्य केल होतं. आणि तेव्हापासूनचं या जोडीला खूपच प्रेम मिळत आहे. आणि हे दोघे सतत आपल्या प्रेमासाठी चर्चेत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Bollywood