मुंबई, 1 जून- बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) गोविंदा(Govinda) यांच्या अनोख्या डान्स स्टाईलवर सर्वच फिदा आहेत. गोविदा जेव्हा जेव्हा एखाद्या शोमध्ये सहभागी होतत तेव्हा त्यांना डान्सच्या स्टेप करून दाखवायला सांगितलं जात. नुकताच अभिनेता ‘सुपर डान्सर’ सीजन 4 (Dance Deewane 4) मध्ये सहभागी झाला होता. मात्र यावेळी त्यांच्यासोबत त्याची खास अभिनेत्री नीलम कोठारी (Neelam Kothari) सुद्धा होती. यावेळी दोघांनी जबरदस्त डान्ससुद्धा सादर केला.
अभिनेत्री नीलम कोठारीच्या पतीने म्हणजेच अभिनेता समीर सोनीने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेयर करत लिहिलं आहे, ‘तब्बल 20 वर्षांची प्रतीक्षा आज संपली’. याचाच अर्थ की नीलम आणि गोविंदा जवळजवळ 20 वर्षांनी एकत्र दिसून आले आहेत.आपल्या अभिनय कारकीर्दीच्या सुरुवातीला अभिनेता गोविंदा आणि नीलम यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यावेळी त्यांची जोडी खुपचं गाजली होती. हे दोघेही कलाकार एकमेकांमुळे नेहमीच चर्चेत असायचे. असं म्हटलं जात की अभिनेता गोविंदा यांनी नीलमवर आपलं प्रेम असल्याचं मान्यदेखील केलं होतं. मात्र नीलम यांचं गोविंदावर प्रेम नव्हतं. त्यामुळे या नात्याला काहिच भविष्य नव्हतं. नीलम यांनी अभिनेता समीर सोनीसोबत लग्न केल आहे. आणि हे दोघेही सुखाने आपला संसार करत आहेत. (हे वाचा: HBD: 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर झालं होतं पूजा गौरचं ब्रेकअप ) नुकताच नीलम आणि गोविंदा ही सुपरहिट जोडी ‘सुपर डान्सर 4’ मध्ये उपस्थित होती. या दोघांना पाहून चाहत्यांना खुपचं आनंद झाला होता. यावेळी स्पर्धकांनी या जोडीच्या गाण्यावर धम्माल डान्स सादर केला. (हे वाचा: HBD: राज कपूर यांच्यासाठी विकले होते दागिने, वाचा नर्गिस यांचा तो किस्सा ) तसेच गोविंदा आणि नीलम यांनी सुद्धा कित्येक वर्षांनी स्टेजवर एकत्र डान्स सादर केला आहे. यावेळी स्पर्धकांसह शोचे परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बसू आणि गीता मां देखील भारावून गेले होते. आणि त्यांचा डान्स एन्जॉय करत होते.

)







