मुंबई 5 जून: नागिण या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता पर्ल व्ही पुरी (Pearl V Puri) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका तरुणीनं त्याच्यावर चक्क बलात्काराचे आरोप केले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. (Pearl V Puri in rape case) दरम्यान या प्रकरणावर निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) हिनं संताप व्यक्त केला आहे. तिनं पर्लची बाजू घेत विनाकारण खोट्या प्रकरणात त्याला अडकवलं जातंय असे उलट आरोप तरुणीवर केले आहेत. पर्लनं कोणाचाही बलात्कार केलेला नाही असा दावा एकतानं केला आहे. पर्ल हा एकताच्या नागिण या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होता. त्यामुळं त्याला अटक होताच अनेकांनी एकतावर टीका करण्यास सुरुवात केली. मात्र एकतानं देखील जोरदार प्रत्युत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. तिनं पर्लची बाजू घेत एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणाली, “मुलींची छेडछाड करणाऱ्या किंवा त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या कलाकाराला माझ्या मालिकांमध्ये स्थान मिळत नाही. पण पर्ल मात्र निर्दोष आहे. त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहे. माझं कालंच त्या तरुणीच्या आईशी बोलणं झालं. तिनं मला स्पष्ट शब्दात सांगितलं की मुलीचे वडिलचं अभिनेत्यावर खोटे आरोप करत आहेत. त्याला अटक व्हावी म्हणून त्यांनी एक बनावटी कथा रचली आहे.” अशा आशयाची पोस्ट एकतानं केली आहे. सोबतच तिनं पर्ल आणि त्या तरुणीचा एक फोटो देखील शेअर केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तरुणीच्या आईसोबत केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील एकताकडे आहे. अन् पुरावा म्हणून ती पोलिसांना देऊ शकते असा दावा तिनं केला आहे. ‘लसीकरण मोहिमेत होतोय पक्षपातीपणा’; स्कॅम 1992 फेम अभिनेत्रीचा गंभीर आरोप
या अभिनेत्रीमुळं मोडला करण-निशाचा संसार? इन्स्टा चॅटचे मेसेज होतायेत व्हायरल एकताच्या या पोस्टमुळं या बलात्कार प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. आतापर्यंत अनेकजण पर्लवर टीका करत होते. पण आता त्या तरुणीला देखील दोष दिला जात आहे. दरम्यान तिच्या वडिलांनी अभिनेत्यावर खोटे आरोप का केले? अद्याप सिद्ध झालेलं नाही. पण एकतानं केलेला दावा जर खरा ठरला तर तरुणी आणि तिच्या वडिलांना मोठी शिक्षा मिळू शकते. पर्ल व्ही पुरी हा छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यानं आतापर्यंत बेपनाह प्यार, ब्रह्मराक्षस 2, नागिन 3, ‘नागार्जुन एक योद्धा’ यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही काळात तो नागिन या मालिकेमुळं प्रचंड चर्चेत होता. सोशल मीडियावर देखील त्याची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या अटकेमुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.