मुंबई 5 जून: कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. परिणामी लसींचा देखील तुटवडा जाणवत आहे. (Corona vaccination) पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही लोकांवर अन्याय केला जातोय. लसीकरणात पक्षपातीपणा केला जातोय असा गंभीर आरोप अभिनेत्री श्रेया धनवंतरी (Shreya Dhanwanthary) हिनं सरकारवर केला आहे.
द फॅमेली मॅन आणि स्कॅम 1992 या वेब सारिजमधून नावारुपास आलेली श्रेया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. यावेळी तिनं देशातील लसीकरणावर भाष्य केलं. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं लसीकरणात पक्षपातीपणा केला जातोय असा खळबळजनक आरोप केला. ती म्हणाली, “लसीकरणासाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतंय. अन् त्यासाठी काही अॅप सुरु करण्यात आले आहेत. मात्र हे सर्व अॅप प्रामुख्यानं इंग्रजी भाषेतच माहिती देतात. देशभातील बहुतांशी लोकांना ही भाषा व्यवस्थित कळत नाही अशी मंडळी यामुळं गोंधळली आहेत. शिवाय हे अॅप वापरायला देखील खुपच किचकट आहेत. स्मार्ट फोनशिवाय वापरले जाऊ शकत नाही. सरकारनं सर्वसामान्य लोकांचा विचार करुन कोरोना अॅपची निर्मिती केली पाहिजे होती. सरकार लसीकरणाच्या बाबतीत पक्षपातीपणा करतेय.”
या अभिनेत्रीमुळं मोडला करण-निशाचा संसार? इन्स्टा चॅटचे मेसेज होतायेत व्हायरल
As per Our World in Data, the number of people who have received at least one dose of vaccine in India is 17.2 crore. We have overtaken the US in terms of the number of people in our country who have received the first dose of vaccine: Dr. VK Paul, Member-Health, Niti Aayog pic.twitter.com/6fWoqv3iEF
— ANI (@ANI) June 4, 2021
देशात करोना लसींचा तुटवडा असला तरी भारतानं लसीकरण मोहिमेत अमेरिकेला मागे सोडलं आहे. अमेरिकेपेक्षा भारतात सर्वाधिक नागरिकांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. यासाठी निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी जागतिक आकडेवारीचा दाखला दिला. या आकडेवारीनुसार अमेरिकेच्या तुलनेत भारतात करोना लसीचा पहिला डोस सर्वाधिक नागरिकांनी घेतला आहे. त्याचबरोबर भारतातील लसीकरणाची आकडेवारी त्यांनी जाहीर केली. देशात 4 जूनपर्यंत 17.85 कोटी लोकांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस 4.56 कोटी लोकांनी घेतला असून आतापर्यंत एकूण 22.41 कोटी डोस दिले गेले आहेत. लसीरकरण मोहिमेंतर्गत 60 वर्षांवरील 43 टक्के लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Corona patient, Corona vaccination, Entertainment