मुंबई 5 जून: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याची पत्नी निशा रावल (Nisha Rawal) हिनं त्याच्यावर घरगुती हिंसाचार आणि अनैतिक संबंध ठेवल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटकही केली होती. करणचे अभिनेत्री हिमांशी पराशरसोबत (Himanshi Parashar) संबंध असल्याची चर्चा आहे. सध्या त्यांच्या इन्स्टाग्राम चॅटिंगचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.
करण आणि हिमांशी यांनी ‘मावन टंडिया चावा’ या पंजाबी मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेदरम्यान दोघांचे काही रोमँटिक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिवाय दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं जात होतं. या पार्श्वभूमीवर हिमांशीसोबत नवा संसार थाटण्यासाठी निशाला त्रास दिला असे आरोप करणवर केले जात आहेत. शिवाय तिनं देखील त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप त्याच्यावर केले आहेत. दरम्यान करण आणि हिमांशीनं केलेल्या इन्स्टाग्राम चॅटिंगचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
निशाच्या जखमा पाहून दीपिका संतापली; करणवर केली जोरदार टीका
View this post on Instagram
सोनालिका झाली माधवी भाभी; मराठी अभिनेत्रीला कसं मिळालं 'तारक मेहता'मध्ये काम?
हिमांशीनं अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती खाली पडते व करण तिला सावरतो. यावर तिनं “करण म्हणतो मी डाउन टू अर्थ आहे.” अशी कमेंट केली होती. या कमेंटवर करणनं केवळ हसून प्रतिक्रिया दिली होती. मात्र अशा चॅटिंगमुळंच करणच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं असं काही नेटकरी म्हणत आहेत. काहींनी तर या व्हिडीओसाठी हिमांशीला ट्रोल देखील केलं होतं. करणला एक लहान मुलगा आहे त्याचा नाद सोड अशी विनंती देखील काही टीकाकारांनी केली होती. करण-निशा प्रकरणामुळं हा व्हिडीओ आणि ते चॅट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिमांशीनं मात्र अद्याप या प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actor, Tv actress