जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Radhika Madan: छोट्या पडद्याविषयी केलेलं 'ते' विधान राधिका मदनला पडलं महागात; आता एकता कपूरनेही फटकारलं

Radhika Madan: छोट्या पडद्याविषयी केलेलं 'ते' विधान राधिका मदनला पडलं महागात; आता एकता कपूरनेही फटकारलं

राधिका मदन

राधिका मदन

नुकतंच एका मुलाखतीत राधिका मदानने टीव्ही इंडस्ट्रीबाबत एक विधान केले होते, ज्यामुळे तिला आता टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता टीव्ही क्वीन एकता कपूरनेही राधिकाच्या वक्तव्यावर नाराजी आणि खंत व्यक्त केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 जानेवारी:  छोट्या पडद्यावरून सुरुवात करत आज बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे राधिका मदान. ती सध्या तिच्या ‘कुत्ते’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच एका मुलाखतीत राधिका मदानने टीव्ही इंडस्ट्रीबाबत एक विधान केले होते, ज्यामुळे तिला आता टीकेला सामोरे जावे लागत आहे. राधिका मदनच्या कमेंटवर टीव्हीवरच्या अनेक कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. प्रसिद्ध अभिनेत्री सायंतानी घोष म्हणाली होती की, तिने टीव्हीसाठी असे बोलायला नको होते. आता टीव्ही क्वीन एकता कपूरनेही राधिकाच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राधिका एका मुलाखतीत टीव्ही इंडस्ट्रीबद्दल म्हणाली होती, ‘‘मी 48 ते 56 तास सतत काम केलं आहे. स्क्रिप्टबद्दल विचारल्यावर ते म्हणायचे, तुम्ही सेटवर जा, गरमागरम स्क्रिप्ट येत आहे. रात्री एपिसोड टेलिकास्ट करायचा आहे, त्यामुळे लवकर शूटिंग करण्याची घाई असायची. आमचे डायरेक्टर्स दर महिन्याला बदलत असायचे. जो फ्री असेल तो दिग्दर्शक येणार.’’ हेही वाचा - Salman Khan: ‘तो पाच तास उशीरा आला अन…’ कुब्रा सैतने सांगितला सलमान खानचा ‘तो’ किस्सा ती पुढे म्हणाली, ‘‘मला आठवतंय की एक दिग्दर्शक तिथे होते आणि मी त्यांना फक्त माझ्या पात्राबद्दल विचारत होते की माझं पात्र असं नाही, कारण हे सर्व त्याच्या बालपणात घडलं आहे. तो दिग्दर्शक इकडे तिकडे करत होता. मी बोलल्यामुळे तो नाराज झाला आणि नंतर म्हणाला की राधिका, जेव्हा आपण चित्रपट करू तेव्हा आपण एका सीनवर तीन दिवस चर्चा करू. आपल्याला रात्री एपिसोड टेलिकास्ट करायचा आहे. त्यामुळे आता चर्चा नको. त्यामुळे चित्रपट केल्यावर एका सीनवर चर्चा करण्यासाठी आपल्याला तीन दिवस मिळतील, ही गोष्ट माझ्या मनात बसली.’’ असं राधिकाने सांगितलं होतं.

News18

राधिकाच्या या मुलाखतीनंतर अभिनेत्री सायंतनी घोषने संताप व्यक्त केला होता. ‘‘राधिकाच्या बोलण्याने मी दुखावली गेली आहे. टीव्हीमुळेच अनेक महिलांना रोजगार मिळत आहे. तसेच चित्रपटातील बडे स्टार्सही टीव्हीवरून आपल्या करिअरला सुरुवात करतात. या प्लॅटफॉर्मवर येऊन ते त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करतात आणि राधिका असं बोलत आहे.’’ असं सायंतनी म्हणाली होती. आता एकता कपूरने देखील राधिकावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘‘दुःखद आणि लज्जास्पद. कलाकारांना त्यांच्या मुळांबद्दल आदर नाही’’ असं तिने म्हटलंय.

News18लोकमत
News18लोकमत

राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या टीव्ही शोमधून केली होती. यानंतर ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली. टीव्हीमध्ये नाव कमावल्यानंतर राधिका फिल्मी दुनियेकडे वळली. तिने ‘पटाखा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता राधिका बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात