जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / भाऊ अरबाजने तोडले होते सलमानचे दात, काय घडलं होतं नेमकं

भाऊ अरबाजने तोडले होते सलमानचे दात, काय घडलं होतं नेमकं

भाऊ अरबाजने तोडले होते सलमानचे दात, काय घडलं होतं नेमकं

बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि त्याच्या भावांमधील बाँडिंग सर्वपरिचित आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 02 जून : बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि त्याच्या भावांमधील बाँडिंग सर्वपरिचित आहे. सलमान अरबाज आणि सोहेल प्रत्येक चांगल्या वाईट वेळेत एकमेकांची साथ देतात. त्यांच्यातील नातं एवढं घट्ट आहे की, सलमान कुठेही गेला तरीही त्याचे आणि त्याच्या भावांचे किस्से संपता संपत नाही. सध्या सलमान त्याचा आगामी सिनेमा ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण या ठीकाणीही सलमान आणि त्याच्या भावांचे किस्से प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहेत. नुकतीच भारतच्या प्रमोशनसाठी सलमान आणि कतरिनानं द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कतरिना आणि सलमाननं त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सलमान, सोहेल आणि अरबाज त्यांच्या बालपणीचे किस्से ऐकताना पूर्णपणे त्यात हरवून जातात. ‘कपिल शर्मा शो’मध्ये काही दिवसांपूर्वी काहीसं असंच घडलं. सलमाननं यावेळी त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगताना भाऊ अरबाजमुळे त्याचे दोन दात कसे तुटले होते याचा एक किस्सा सांगितला.

    जाहिरात

    सलमान म्हणाला, ‘आम्ही त्यावेळी माझ्या मावशीच्या घरी गेलो होतो. तिथे घसरगुंडी होती. ज्यावर एका बाजूनं वर चढायचं आणि दुसऱ्या बाजूने खाली घसरायचं. मी त्यावेळी वरच्या बाजूला आणि अरबाज त्याच्या खालच्या बाजूला होता. मला अरबाजला वर येण्यापासून थांबवायचं होतं आणि तो मला खाली घसरण्यापासून थांबवायचं होतं. बरावेळ आमचा खेळ असाच सुरू होता पण शेवटी अरबाज वैतागला आणि त्यानं मला खाली खेचलं आणि तिथून बाजूला झाला. पण मी जोरात खाली आल्यानं तोंडवर पडलो आणि माझे पुढचे दोन दात तुटले.’

    सलमान पुढे म्हणाला, माझे पुढचे दोन दात तुटल्यानं मला खूप लाज वाटत असे. त्यामुळे मी काही दिवस नकली दात लावून फिरत असे. सलमानचा हा किस्सा ऐकल्यावर त्याच्या चाहत्यांना मात्र हसू आवरणं कठीण झालं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात