ड्रग प्रकरणात मोठी बातमी, आज किंवा उद्या होणार श्रद्धा कपूर आणि सारा अली खानची चौकशी- सूत्र

ड्रग प्रकरणात मोठी बातमी, आज किंवा उद्या होणार श्रद्धा कपूर आणि सारा अली खानची चौकशी- सूत्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूनंतर या प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आले आहे. एनसीबीकडून सुरू असणाऱ्या या प्रकरणातील तपासामध्ये अनेक नावं समोर येत आहेत. दरम्यान याप्रकरणी आता दोन दिग्गज अभिनेत्रींचे नाव समोर आल्याने संपूर्ण बॉलिवूड आणि त्यांचे चाहते हादरले आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूनंतर या प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आले आहे. एनसीबीकडून सुरू असणाऱ्या या प्रकरणातील तपासामध्ये अनेक नावं समोर येत आहेत. दरम्यान याप्रकरणी आता दोन दिग्गज अभिनेत्रींचे नाव समोर आल्याने संपूर्ण बॉलिवूड आणि त्यांचे चाहते हादरले आहे. अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे समोर आल्याने तपासाला एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर्सची चौकशी करताना समोर आली आहेत. त्यामुळे एनसीबीकडून प्रश्नोत्तरासाठी श्रद्धा आणि साराला बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. एनसीबीकडून आज किंवा उद्याच सारा-श्रद्धाची चौकशी केली जाईल, अशी माहिती एनसीबीच्या टॉपच्या सूत्रांकडून मिळते आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अभिनेत्रीबरोबर सुशांतने काम केले आहे.

(हे वाचा-KBC 12 मध्ये घुमणार बिग बींचा आवाज, पाहा कोरोनाकाळातील सेटवरील तयारीचा VIDEO)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB (Narcotics Control Bureau) या दोन्ही अभिनेत्रींना या आठवड्यात समन्स बजावू शकते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहे. आता या प्रकरणात अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांची चौकशी होण्याची देखील शक्यता आहे. त्याचप्रमाणे अशी माहिती समोर येत होती की, रियाच्या चौकशीदरम्यान चित्रपटसृष्टीतील 25 जणांचे नाव समोर आले होते. अशात एनसीबी याचा तपास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खान एका हाय प्रोफाइल ड्रग पेडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत आहे.

(हे वाचा-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहे रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन; NCB प्रमुखांचा दा)

गेल्या काही दिवसांत सुशांत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनचा शोध करणाऱ्या एजंसी एनसीबीला मोठं यश मिळालं होतं. मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी केल्यानंतर एनसीबीने 6 जणांचा पकडलं होतं. या 6 जणांचे संबंध बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटशी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. रियाने आपल्या जबाबात सांगितले आहे की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूर्वीही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं.

First published: September 22, 2020, 10:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading